उत्सव लोकशाहीचा...!

उत्सव लोकशाहीचा...!

मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघात सोमवारी (ता. १३) मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदान यंत्र व अन्य आवश्यक साहित्यांचे वाटप रविवारी झाले. मावळमधील पिंपरी विधानसभा मतदारसंघातील केंद्रांचे साहित्य ऑटो क्लस्टर चिंचवड, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील केंद्रांचे साहित्य थेरगाव येथील कामगार भवन, मावळ विधानसभा मतदारसंघातील केंद्रांसाठी तळेगाव दाभाडे येथील नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि शिरूरमधील भोसरी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रासाठी घरकुलजवळील इमारतीतून साहित्य वाटप झाले. यावेळी मतदान यंत्रांसह आवश्यक साहित्य घेऊन अधिकारी-कर्मचारी नियुक्त केलेल्या केंद्रांवर पोहोचले. त्यासाठी पीएमपी, एसटी बस व खासगी वाहनांची सोय केली होती. त्याचीच ही चित्रमय झलक. (रितेश छपरीबंद : सकाळ छायाचित्रसेवा)
--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com