घारापुरी मतदान केंद्रासाठी 
कर्मचाऱ्यांचा बोटीतून प्रवास

घारापुरी मतदान केंद्रासाठी कर्मचाऱ्यांचा बोटीतून प्रवास

पिंपरी, ता. १२ ः मुंबई जवळील समुद्रातील ऐतिहासिक ठिकाण म्हणजे घारापुरी. गेट वे ऑफ इंडिया येथून अनेक जण बोटीने प्रवास करून घारापुरीत पोहोचतात. रविवारी (ता. १२) मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बोटीतून प्रवास केला. निमित्त होते, लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाचे.
मावळ लोकसभा मतदारसंघातील उरण विधानसभा मतदारसंघात घारापुरी बेटाचा समावेश होतो. घारापुरी बेटावर ३८९ पुरुष आणि ४२० महिला असे एकूण ८०९ मतदार आहेत. सोमवारी (ता. १३) येथे मतदान होत आहे. तेथील केंद्रासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी व पोलिस रविवारीच बोटीने तिथे गेले. विविध लिफाफे, स्टेशनरी, ओआरएससह, प्रथमोपचारपेटी, दिशादर्शक फलक, मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक साहित्य, विविध अहवालाच्या प्रती आणि मार्गदर्शक सूचनांचे साहित्य त्यांनी सोबत घेतले. हे पथक आधी जीपने जेएनपीटी बंदरापर्यंत आले आणि तेथून बोटीने घारापुरीत पोचले.
--19347

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com