मतदारांची नावे वेगवेगळ्या केंद्रांत

मतदारांची नावे वेगवेगळ्या केंद्रांत

सोमाटणे,ता.१३ ः येथे मतदार याद्यांत नावे वेगवेगळ्या बुथवर आल्याने मतदारांना भर उन्हात धावपळ करावी लागली. अनेकांनी कंटाळून मतदान टाळल्याचाही प्रकार घडला.
सोमाटणे येथील अनेक मतदारांना मतदार चिठ्ठी वाटली गेली नाही. पूर्वीप्रमाणे गावातील मतदारांनी मतदान केंद्रावर हजेरी लावली. चौराईनगरमधील काही मतदारांची नावे गावातील यादीत तर गावातील काही मतदारांची नावे चौराईनगरमधील मतदार यादीत आल्याचा प्रकार झाला.
मतदार नवनाथ मुऱ्हे म्हणाले,‘‘सोमाटणे गाव आणि चौराईनगर या दोन्ही विभागांत दोन किलोमीटरचे अंतर असून मतदानासाठी मतदारांना भर उन्हात धावपळ करत हे अंतर पार करावे लागले. या धावपळीच्या त्रासाला कंटाळून काही मतदारांनी मतदानाला न जाता आपले घर गाठल्याचा प्रकारही घडला. सर्वच मतदारांना मतदार चिठ्ठी आधीच मिळाली असती तर मतदारांवर धावपळ करण्याची पाळी आली नसती.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com