नवमतदार

नवमतदार

‘‘विविध घटकांना न्याय देणारे असेल, असा सारासार विचार करून प्रत्येकाने मतदान केले आहे. देशाची प्रगती आणि विकास या महत्त्वाच्या बाबी मतदानासारख्या प्रक्रियेतून पूर्ण होणार आहेत. त्यामुळे सर्व नवमतदारांनी याचा बारकाईने विचार करून मतदान करायला हवे.’’
- सादिया शेख, स्वप्ननगरी, अजमेरा कॉलनी

‘‘मतदानाचा दिवस हा सुट्टीचा दिवस नसून, तो राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचा दिवस आहे. संविधानाने सर्व नागरिकांना मतदान ही फक्त जबाबदारीच नाही, तर योग्य लोकप्रतिनिधी निवडण्याचा दिलेला एक हक्क पार पाडला आहे.’’
- गौरी काटे, कवडेनगर, पिंपळे गुरव

‘‘देशाच्या विकासासाठी तरुणांच्या योगदानाला अनन्यसाधारण महत्त्व असते. त्यामुळे या निवडणुकीत प्रत्येक तरुणाने मतदान करताना अगोदर नोकरी, स्वयंरोजगार आदींसाठी उपलब्ध असणारी संधी आणि सरकारची इच्छाशक्ती तपासून आवडत्या उमेदवाराला मतदान करणे गरजेचे आहे.’’
- श्रद्धा वडके, डोळेमळा, नवी सांगवी

‘‘मतदान हा लोकशाहीने सर्वांना दिलेला एक महत्त्वाचा आणि अनमोल अधिकार आहे. या अधिकारामुळे आपण देशाच्या विकासाला दिशा देऊ शकतो.’’
- ऋतिका गुप्ता, साई चौक, नवी सांगवी

‘‘परिवर्तनासाठी मतदान करणे आवश्‍यक आहे. अन्यथा देशाच्या विकासाला खीळ बसू शकते. मतदान करताना फक्त आपल्या पसंतीचा उमेदवार शोधू नका, तर त्याने समाजाच्या उद्धाराकरिता काय केले आहे. हे तपासून मतदान केले पाहिजे.’’
- श्रेयश जोगदंड, समतानगर

‘‘जो उमेदवार महिला, तरुणी, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांबाबत संवेदनशील आहे. समाजाचा सर्वांगीण विकास करण्यास कटिबद्ध आहे. अगदी तळागाळातील वंचितांचा विचार करणारे नव्हे; तर प्रत्यक्ष अंमलबजावणीवर विश्‍वास ठेवणारा असेल.’’
- रोहन गाडीवड, थेरगाव

‘‘लोकशाहीमध्ये नागरिकांची खूप महत्त्वाची भूमिका असते. कारण ते त्यांचे हक्क आणि स्वातंत्र्य वापरतात आणि देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा फायदा घेतात. मतदान करण्यासाठी नागरीकांनी पुढे येणे आवश्‍यक आहे.’’
- अथर्व शिंदे, अजमेरा कॉलनी

‘‘यावर्षी माझे पहिले मतदान करून माझी जबाबदारी पार पाडली आहे. नागरिकांनीदेखील समाजातील चित्र बदलण्यासाठी मतदान करणे आवश्‍यक आहे.’’
- सृष्टी प्रसाद, वास्तुउद्योग

‘‘मतदानाचा हक्क हा मूलभूत अधिकाराबरोबरच आपले कर्तव्यही आहे. मतदानातून आपण स्वतःशी, समाजाशी आणि देशाशी असलेली बांधिलकी अभिव्यक्त करतो.’’
- रवींद्र शेजवळ, चैत्रबन, मतिमंद नवमतदार

‘‘मतदान हे कर्तव्य आहे. आधी लोकशाही नंतर सर्वकाही सर्वांनीच मतदानाचे कर्तव्य पार पाडले पाहिजे.’’
- चंद्रकांत मांगडे, दिव्यांग, दापोडी

‘‘पहिल्यांदाच मतदान करतोय. आजवर रस्त्यावर फिरणाऱ्या प्रचाराच्या गाड्या, राजकीय धुमाकूळ पाहिला. देशहित प्रथम समजून देशाच्या समतेसाठी, मतदानाचे पवित्र कर्तव्य बजावले याचा आनंद आहे.’’
- ओंकार मोरे, नवमतदार, जुनी सांगवी.

‘‘माझ्या आयुष्यातले पहिले मतदान हे तालुक्याला नसून देशाकरिता आहे, याचा मला आनंद आहे.’’
- पारस मारणे, नवमतदार, जुनी सांगवी

२) नवमतदार - id 143637 ओंकार रमेश मोरे जुनी सांगवी
३) नवमतदार - wao 213 पारस वसंत मारणे जुनी सांगवी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com