पिंपरी मावळ लोकसभा पॉईंटर

पिंपरी मावळ लोकसभा पॉईंटर

पनवेल विधानसभा
- दुपारनंतर पाऊस झाल्याने मतदानाचा टक्का घसरला
- ग्रामीण भागात सकाळच्या टप्प्यात अधिक मतदान
- २० गावांतील वीजपुरवठा खंडित झाल्याने परिणाम
- मोबाईलमधील बॅटरीच्या प्रकाशाचा मतदानाला आधार
- अनेकांनी फिरवली मतदानाकडे पाठ

कर्जत विधानसभा
- काही भागात ऊन, काही ठिकाणी पाऊस
- ग्रामीण भागात मतदारांची गर्दी
- धामोते, कर्जत, दहिवली केंद्रावर ईव्हीएम बंद
- दुपारनंतर अवकाळी पावसाने झोडपले
- उन्हामुळे थांबलेला मतदार घरातच अडकून पडला

उरण विधानसभा
- शहरीपेक्षा ग्रामीण भागात मतदान जास्त
- युवकांच्या चेहऱ्यावर चैतन्याचा आनंद
- दुपारच्या उन्हातही बजावला मतदानाचा हक्क
- मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
- अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत

मावळ विधानसभा
- शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक उत्साह
- उन्हामुळे दुपारी बहुतांशी केंद्रांवर शुकशुकाट
- महायुती व महाविकास आघाडीचे गावांमध्ये बूथ
- कान्हेत ‘गड किल्ल्यांचा मावळ’ संकल्पनेवर आधारित केंद्र
- लोणावळ्यात पावसाने तारांबळ, मळवलीत यंत्रांत बिघाड

चिंचवड विधानसभा
- मतदारांच्या स्वागतासाठी रांगोळ्या
- अनेकजण मॉर्निंग वॉकनंतर थेट मतदान केंद्रांवर
- वोटर स्लीप घरपोच न मिळाल्याने बुथवर जाऊन स्लीप मिळवावी लागली
- काही ठिकाणी पक्षांचे प्रतिनिधी मतदारांचे मोबाईल सांभाळत होते.
- मतदारयादीत नाव न सापडल्याने अनेकांची निराशा

पिंपरी विधानसभा
- पिंपरी गावात दोन ठिकाणी तांत्रिक कारणांमुळे मतदान यंत्र बंद
- मतदानाला उशीर झाल्याने मतदार नाराज
- मोबाईल बंदीमुळे मतदार व पोलिसांत शाब्दिक बाचाबाची
- महापालिका आयुक्‍त शेखर सिंह यांचे सपत्निक मतदान
- ज्येष्ठ नागरिक आणि अपंग बांधवांसाठी प्रत्‍येक मतदान केंद्रावर व्‍हीलचेअर


मावळ लोकसभा मतदारसंघात सकाळपासून मतदारांचा उत्साह होता. देशाच्या लोकसभेच्या अनुषंगाने मतदान केलेल्या मतदारांचा मी आभारी आहे. सर्वांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवून चांगल्या प्रकारचे काम केले आहे. पण, रायगड जिल्ह्यात दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. दोन-अडीच तास वीजपुरवठा खंडित होता. त्यामुळे, त्या मतदान केंद्रांवर फेरमतदानाची मागणी निवडणूक आयोगाकडे केलेली आहे.
- श्रीरंग आप्पा बारणे, उमेदवार, शिवसेना (महायुती)

आज वातावरण चांगलं आहे. मतदारांचा उत्साह पाहता महाविकास आघाडी आणि उमेदवार म्हणून माझा विजय निश्चित होईल, असे वाटते. गेल्या दहा वर्षांत मतदारसंघात दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याने अनेकांची नाराजी आहे. ती नाराजी आज मतदानाच्या रूपाने दिसून येईल. मतदान केंद्रावरील रांगा या परिवर्तनाची नांदी आहे. आज देशाला वाचवायचे, हे मतदारांनी मनावर घेतलंय. त्यांनीच निवडणूक हाती घेतली आहे.
- संजोग वाघेरे पाटील, उमेदवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष (महाविकास आघाडी)

मावळातील विधानसभानिहाय मतदान
मतदारसंघ / मतदान टक्केवारी
पनवेल / ४९.२१

कर्जत / ६०.१२
उरण / ६४.७५
मावळ / ५३.०२
चिंचवड / ४९.४३
पिंपरी / ४८.२५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com