रोपवाटिका व्यावसायिकांना पावसाचा दिलासा

रोपवाटिका व्यावसायिकांना पावसाचा दिलासा

सोमाटणे, ता. १६ ः गेल्या अनेक वर्षापासून पवनमावळात रोपवाटिका हा शेतीला जोड व्यवसाय केला जातो. यातून शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळण्यास मदत होते. सध्या सुरु असलेल्या वळीवाच्या पावसामुळे मावळातील रोपांना मागणी वाढली आहे. त्यामुळे रोपवाटिका व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.

अनेक शेतकऱ्यांनी स्वतःची जागा नसल्याने स्थानिक शेतकऱ्यांची जागा भाडेतत्त्वावर घेऊन हा व्यवसाय सुरु केला. यातून व्यवसायिकांना दरवर्षी चांगला पैसाही मिळू लागल्याने अल्पावधीत सोमाटणे, परंदवडी परिसरात शंभर रोपवाटिका तयार झाल्या आहेत. मात्र, यावर्षी तापमान वाढीचा फटका या याव्यवसायाला बसला असून कडक उन्हामुळे पाणी जास्त देऊनही रोपांची वाढ नेहमीप्रमाणे झाली नाही, रोगाचे प्रमाण वाढले, कडक उन्हात लावलेली रोपे जळण्याचे प्रमाण अधिक असल्याने ग्राहकांनी रोपे लावणी थांबवली. परिणामी, यावर्षी मागणी घटल्याने रोपवाटिकेत रोपे पडून राहिली होती. मात्र, गेल्या चार दिवसात मावळासह अनेक ठिकाणी समाधानकारक पाऊस पडला. आणि हवेतील उकाडा कमी झाल्याने रोपांच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. या पावसामुळे रोपे लावण्याला सुरुवात झाली आणि रोपांना मागणी वाढली असून विक्री सुरु झाल्याने रोपवाटिका व्यवसायिकांना दिलासा मिळाला आहे.

PNE24U19999

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com