मावळ निवडणूकीतील मतदान यंत्रे ‘सील’

मावळ निवडणूकीतील मतदान यंत्रे ‘सील’

पिंपरी, ता. १५ : मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदान यंत्रे (ईव्हीएम) व टपाली मतपेट्या बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये तयार केलेल्या स्ट्राँग रूममध्ये मंगळवारी सुरक्षित ठेवण्यात आल्या. परिसरात कडेकोट बंदोबस्त असून स्ट्राँगरूमम ‘सील’ केली आहे. चार जून रोजी मतमोजणी होणार आहे.
मावळ लोकसभा निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर, निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, अतिरिक्त पोलिस आयुक्त वसंत परदेशी, सीआरपीएफचे सुभेदार दुर्गेश कुमार मीना यांच्यासह उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मतदान प्रक्रियेसाठी एकूण सात हजार ६९८ बॅलेट युनिट, दोन हजार ५६६ कंट्रोल युनिट आणि दोन हजार ५९३ व्हीव्हीपॅट यंत्रे वापरली आहेत.

विधानसभा मतदारसंघनिहाय वापरलेली यंत्र
मतदारसंघ/ बॅलेट युनिट/ कंट्रोल युनिट/ व्हीव्हीपॅट
पनवेल / १६३२ / ५४४ / ५४८
कर्जत / १०१७ / ३३९ / ३४५
उरण / १०३२ / ३४४ / ३४६
मावळ / ११७० / ३९० / ३९६
चिंचवड / १६४७ / ५४९ / ५५६
पिंपरी / १२०० / ४०० / ४०२

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com