उन्हा-पावसात मोकळ्‍या जागेत कार्यक्रम; स्वच्छतागृहाचा अभाव

उन्हा-पावसात मोकळ्‍या जागेत कार्यक्रम; स्वच्छतागृहाचा अभाव

आशा साळवी -सकाळ वृत्तसेवा

पिंपरी, ता.१६ ः वल्लभनगर येथील सरदार वल्लभभाई पटेल बॅडमिंटन हॉलमध्ये दहा बाय दहाच्या खोलीमध्ये वल्लभनगर ज्येष्ठ नागरिक संघाचा कारभार चालतो. संघाच्या सदस्यांना बसण्यासाठी सोय नाही. महिलांसाठी स्वच्छतागृहांची व्‍यवस्था नाही. पुरेशा जागेअभावीमुळे उन्हा-पावसात ज्येष्ठांना मोकळ्‍या जागेत कार्यक्रम आणि सभा घ्यावा लागतात. गेल्या २२ वर्षांपासून या प्रकारच्या निरनिराळ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे, अशी व्यथा वल्लभनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी ‘सकाळ’च्या ‘संवाद ज्येष्ठांशी’ या कार्यक्रमात व्‍यक्त केली.
यावेळी संघाचे अध्यक्ष प्रभाकर कोळी, सचिव शकुंतला महामुनी, सदस्य मुक्ता चौधरी, सुरेश शिंदे, विजय रेळेकर, अंकुश गायकवाड, द्रौपदी सपकाळ, दगडू सातपुते, भगवान बनसोडे, रमेश कोळेकर, भारती शिंदे, कुंदा कांबळे, शांताराम कांबळे, रमेश पंजाबी, सुशीला लंबाते, किरण कोळेकर, रंजना परब, शरदिनी कोळेकर, सरस्वती झरकर, विनोद मोदीराज, माधुरी काळे, विजय हिंगणे, सुनीता कलचरे, हिराबाई आल्हाट, गंगा घोडके, रोहिणी गायकवाड, शंकर जाधव, हौसा पवार, सुभाष पवार, महानंद तागड, रवींद्र अभंग, अंजली तळपे, ज्ञानदेव पवार, धोंडाबाई कोळी, सुभाष कोळी, अन्नपूर्णा घंटी, शकुंतला बोरगे, शारदा जाधव, दत्तात्रेय चौरे, राजेंद्र नाडार, मंजुळा नाडार, सुशीला ढेकळे, सत्वशीला जाधव, उज्वला साळुंखे, गुणवंती पंजाबी, पार्वती कंट्रोलु, रमेश चौधरी, प्रतिभा ठोसर, लक्ष्मण प्रभुदेसाई, बाबासाहेब करे, कमल करे, मनोहर गायकवाड, लक्ष्मी बनसोडे, शोभा गायकवाड, इंदू पवार, कुसुम पवार, जयश्री महामुनी, यमुना चव्हाण, प्रेमा जाधव, नलिनी लेंढे, सरूबाई निकम, कमल शिंदे, विनोद ठोसर आदी यावेळी उपस्थित होते.

आकडे बोलतात
स्थापना
६ डिसेंबर २००१
सभासद संख्या - २८०
महिला संख्या - १६९
पुरुष संख्या - १११

संघाचे उपक्रम
- ज्येष्ठांचे वाढदिवस साजरे करणे
- ७५ वर्षे वयापुढील ज्येष्ठांचा सत्कार करणे
- गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
- महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार.
- एकदिवसीय सहलीचे आयोजन.
- कोजागरी पोर्णिमा उत्सव.
- संघाचा वर्धापन दिन.
- दर तीन महिन्यांनी एक कार्यक्रम
- ज्येष्ठांना कार्ड काढणे
- ज्येष्ठांना पोलिस कार्ड काढणे
- पेन्शन कार्ड काढणे
- आरोग्य शिबिर घेणे

ज्येष्ठांच्या समस्या
- शकुंतला महामुनी म्हणाल्या, ‘‘आमच्या विरंगुळा केंद्राला स्वच्छतागृह नाही.’’
- सुभाष कोळी म्हणाले,‘‘सरकारी बॅंकांमध्ये स्वतंत्र रांग नसल्यामुळे ज्येष्ठांचे हाल होत आहे.’’
- किरण कोळेकर म्हणाले,‘‘महापालिकेच्या ज्येष्ठ नागरिक महासंघाने गरीब ज्येष्ठांना आर्थिक मदत केली पाहिजे.’’
- मंजुळा नाडार म्हणाल्या,‘‘सरकारने ईपीएस पेन्शन वाढवली पाहिजे.’’
- सरूबाई निकम म्हणाल्या,‘‘पाच वर्षांपासून शिधा मिळत नाही. सरकारने धान्य पुरवावे.’’
- लक्ष्मण प्रभुदेसाई म्हणाले,‘‘वायसीएस रूग्णालयात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र रांग असावी.’’
- बबन चौरे म्हणाले,‘‘निवृत्तीनंतर राज्य आणि केंद्र सरकारने ६० वर्षांसाठी पेन्शन सुरु करावे.’’
- इंदू पवार म्हणाल्या ,‘‘तीन वर्षापासून शिधा मिळत नाही. उपासमार होत आहे.’’
- द्रौपदी सपकाळ म्हणाल्या,‘‘हाताचे ठसे न उमटल्यामुळे ११ वर्षांपासून रास्त भाव धान्य दुकानदार धान्‍य देत नाही.’’
- बाबासाहेब करे म्हणाले, ‘‘सरकारी बॅंकामध्ये हयातीचा दाखला घेण्यासाठी हाल होतात. ज्येष्ठांसाठी स्वतंत्र सोय करावी. बँक कर्मचारी उद्धट वर्तन करतात.’’
- रोहिणी गायकवाड म्हणाल्या,‘‘संत तुकारामनगरमध्ये अंतर्गत रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी केली जात आहेत. यासाठी पोलिसांनी गस्त घालावी.’’

‘‘ज्येष्‍ठांसाठी जगणार, ज्येष्ठांसाठी मरणार आहे, या ब्रीद वाक्यानुसार काम करत आहे. ज्येष्ठांना गुडघ्याचे त्रास होत आहेत. वैद्यकीय खर्चावर निर्बंध आले आहेत.’’
- प्रभाकर कोळी, अध्यक्ष, वल्लभनगर ज्येष्ठ नागरिक संघ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com