महर्षी मार्शल आर्टसची कामगिरी ः २ रौप्य, ७ कांस्यपदके

महर्षी मार्शल आर्टसची कामगिरी ः २ रौप्य, ७ कांस्यपदके

पिंपरी, ता.१६ ः राज्य किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशनच्यावतीने अहिल्यानगर येथे आयोजित राज्यस्तरीय किकबॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धेत रहाटणीमधील महर्षी मार्शल आर्टस् स्पोर्ट्स फाउंडेशनच्या खेळाडूंनी १२ सुवर्ण, २ रौप्य आणि ७ कांस्यपदकांची कमाई केली.
जिल्हा क्रीडा संकुलात ही स्पर्धा झाली. स्पर्धेत १८ खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्लेक्स, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथे २१ ते २५ मेपर्यंत होणाऱ्या राष्ट्रीयस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी सर्व पदकप्राप्त खेळाडूंची राज्य संघात निवड झाली आहे. सर्व पदकविजेत्या खेळाडूंना संस्थेचे प्रशिक्षक सागर बनसोडे यांनी मार्गदर्शन केले.
या कामगिरीबद्दल संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सचिन बनसोडे, संचालक धर्मराज पाल, उपाध्यक्ष अमित सरमाने, अभिजीत शालू, कार्याध्यक्ष प्रविण पाल, सचिव सागर बनसोडे, सहसचिव गणेश गवळी, स्वप्निल पाल, गौरव पाल आदींनी अभिनंदन करून खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पदकप्राप्त खेळाडूंची नावे पुढील प्रमाणे :
मुले ः रूद्र सरमाने (२ सुवर्ण), साईराज पवार (२ सुवर्ण), अवनीश बागुल
हेरंब जोशी, सौमित्र जोशी (प्रत्येकी एकेक सुवर्ण); श्रीनिल पवार, प्रतिक भापकर, दक्ष गौर,
आदित्य कोलते, स्वरित धिमन (सर्व कांस्य); मुली - श्रेया पवार, भार्गवी गवळी (प्रत्येकी २ सुवर्ण), तपस्या विश्वकर्मा, अनुष्का सरमाने (प्रत्येकी एकेक सुवर्ण), अक्षता गिरी, सान्वी माळी,
शरयू ओझर्डे (तिघीही कांस्य).
PNE24U20330

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com