डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पिंपरी, ता. १६ : भरधाव डंपरने धडक दिल्याने त्याच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना जुन्या मुंबई - पुणे महामार्गावर चिंचवड स्टेशन येथे गुरूवारी (ता. १६) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.
योगेश श्रीकांत संगनोर (वय २७, रा. चिंचवड, मूळ नांदेड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. योगेश हे दुचाकीवरून चिंचवडहून पिंपरीच्या दिशेने जात होते. दरम्यान, सेंट मदर टेरेसा पुलाजवळ ते ऑटो क्लस्टरकडे वळण घेत असताना भरधाव डंपरने योगेश यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. त्यामध्ये योगेश हे डंपरच्या चाकाखाली सापडले. गंभीर जखमी झाल्याने योगेश यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर डंपर चालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे या मार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com