‘लिव्ह लाइक अ योगी’ पुस्तकावर शनिवारी खुली चर्चा

‘लिव्ह लाइक अ योगी’ पुस्तकावर शनिवारी खुली चर्चा

पिंपरी,ता. १६ ः ‘लेखिका तुमच्या भेटीला’ या उपक्रमाअंतर्गत प्रसिद्ध योग तज्ज्ञ व लेखिका देवयानी एम यांनी लिहिलेल्या ‘लिव्ह लाइक अ योगी’ या पुस्तकावर येत्या शनिवारी (ता.१८) खुली चर्चा आयोजित करण्यात आली आहे. चिंचवड येथील एल्प्रो सिटी मॉल येथील क्रॉसवर्ड बुक स्टोअरमध्ये सायंकाळी पाच वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सकाळ प्रकाशनच्यावतीने डिसेंबर २०२३ मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या ‘लिव्ह लाइक अ योगी’ या पुस्तकामध्ये मानवी आरोग्याशी निगडित अभ्यासपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. आधुनिक व प्राचीन विचारांचा संगम असलेल्या या पुस्तकाच्या लेखिका देवयानी एम स्वतः या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे. आसनांपलीकडील योग म्हणजे काय ?, प्रत्यक्षात योगी म्हणून आपल्याला धावत्या जीवनशैलीत कसे जगता येईल ?, रोजच्या जगण्यात योगशास्त्र कसे उपयोगी पडेल ? हे स्वतः लेखिका या कार्यक्रमात उलगडून सांगणार आहेत. सकाळ प्रकाशनच्यावतीने आयोजित करण्यात येणारा ‘लेखिका तुमच्या भेटीला’ हा कार्यक्रम पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड शहरात पार पडणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com