पक्क्या परवान्यांसाठी जूनमध्ये शिबिर दौरा

पक्क्या परवान्यांसाठी जूनमध्ये शिबिर दौरा

Published on

पिंपरी, ता. २९ : येत्या जून महिन्यामध्ये वाहनांच्या पक्क्या परवान्यांसाठी शिबिर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने कळविले आहे. त्यामध्ये, वडगाव मावळ आणि लोणावळ्याचा समावेश करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत खेड येथे ३ व ४ जून, मंचर येथे १० व ११ जून, जुन्नर येथे १८ व १९ जून, वडगाव मावळ येथे २४ व २५ जून तर लोणावळा येथे २७ व २८ जून यादिवशी पक्के परवाने (अनुज्ञप्ती) शिबिर दौरा होणार आहे. पक्क्या परवान्यांचा कोटा ३१ मे रोजी सायंकाळी ५ वाजता उपलब्ध होणार असल्याचेही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com