चिखलीत मद्यपींमुळे नागरिक त्रस्त

चिखलीत मद्यपींमुळे नागरिक त्रस्त

पिंपरी, ता. १ : चिखली स्पाईन रोड परिसरातील कोयनानगर, शरदनगर, घरकुल रस्ता येथे मद्यपींचा उपद्रव सुरु असतो. त्यामुळे परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. या मद्यपींचा पोलिसांनी योग्य तो बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
स्पाईन रोडच्या मधल्या जागेत तसेच कोयनानगर सेक्टर क्रमांक १९, मंडई चौक या परिसरात रस्त्यालगत अथवा जागा मिळेल तिथे मद्यपींची बैठक बसते. मद्यपान केल्यानंतर एकमेकांमध्ये भांडणे, आरडाओरडा, शिवीगाळ, हाणामारी असे प्रकार घडतात. रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांनाही त्रास दिला जातो. रस्त्यावरच मद्यपींचा धिंगाणा सुरु असतो. त्यामुळे या रस्त्यावरून जाताना नागरिकांमध्येही असुरक्षिततेची भावना निर्माण होते. रोजच्या त्रासामुळे परिसरातील रहिवासी तर अक्षरशः हैराण झाले आहेत.

रस्त्यात अडवून पैशांची मागणी
शरदनगर, घरकुल रस्ता या भागांत रात्रीच्यावेळी मद्यपी नागरिकांना अडवून पैशांची मागणी करतात. पैसे न दिल्यास धमकी देण्यासह हुज्जत घातली जाते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.

कारवाईत सातत्य हवे
मद्यपींविरोधात पोलिसांकडून कधीतरी कारवाई केली जाते. मात्र, नंतर, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे, मद्यपीही बिनधास्त असतात. पोलिसांनी कारवाईत सातत्य ठेवून मद्यपींना वठणीवर आणावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

रस्त्यावर मद्यपींचा अक्षरशः धिंगाणा सुरु असतो. कुठेही दारू पीत बसलेले असतात. नेहमी आरडाओरडा, शिवीगाळ सुरु असते. या मार्गावरून कुटुंबियांसह जातानाही धोकादायक झाले आहे. पोलिसांनी कडक कारवाई करावी.
- स्थानिक नागरिक.

या भागात गस्त अधिक वाढविण्यात येणार आहे. सामान्य नागरिकांना विनाकारण त्रास देणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस सदैव तत्पर आहे.
- राजेंद्र बर्गे, पोलिस निरीक्षक, चिखली पोलिस ठाणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com