नालेसफाईच्या कामांना गती द्या
महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश, विविध भागातील नाल्यांची पाहणी

नालेसफाईच्या कामांना गती द्या महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश, विविध भागातील नाल्यांची पाहणी

पिंपरी, ता. १ ः पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर नालेसफाई तसेच इतर सर्व कामांना गती देऊन, नियोजनबद्ध पद्धतीने काम वेळेत पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले. यासाठी सातत्याने स्थळपाहणी करून पावसाच्या पाण्याचा त्वरित निचरा होईल आणि रस्ते जलमय होणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी, तसेच ड्रेनेज व पाणी पुरवठा विभागाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचनाही त्यांनी शनिवारी (ता. १) संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यात येत आहे. त्याअनुषंगाने आज आयुक्त शेखर सिंह यांनी शहरातील विविध भागातील नाल्यांची तसेच पाणी साठणाऱ्या संभाव्य ठिकाणांची पाहणी केली. तसेच पावसाळ्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊन, नागरिकांच्या घरांमध्ये नाल्याचे पाणी जाणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. त्यादृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
या पाहणी दौऱ्यावेळी सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, मुख्य अभियंता रामदास तांबे, उपायुक्त अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, सुचिता पानसरे, सीताराम बहुरे, सहायक आयुक्त यशवंत डांगे, कार्यकारी अभियंता एस. टी. जावरानी, सुनील बेळगावकर, राजेंद्र शिंदे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, सहायक आरोग्य अधिकारी राजू साबळे, कंचनकुमार इंदलकर, राजेश भाट तसेच इतर संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यांची केली पाहणी
या पाहणी दौऱ्यादरम्यान मिल्कमेड बेकरी चिंचवड, आकुर्डी रुग्णालय, बजाज कंपनी समोरील सबवे, निगडी उड्डाण पूल, माता अमृतानंदमयी शाळा, राधा स्वामी सत्संग भवन, बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी उड्डाण पूल धावडे वस्तीकडील उतार, पीसीएमची चौक, आदिनाथ नगर, आदिनाथ सोसायटीजवळील महामार्गाचा भाग येथील नाल्यांची तसेच संभाव्य पाणी साठणाऱ्या भागांची पाहणी आयुक्त शेखर सिंह यांनी केली. तसेच पूरस्थितीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी महापालिकेच्यावतीने करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा यावेळी घेण्यात आला.


क्षेत्रीय कार्यालय आणि नाल्यांची संख्या
अ क्षेत्रीय -२५
ब क्षेत्रीय-१५
क क्षेत्रीय -२९
ड क्षेत्रीय -१२
इ क्षेत्रीय-१६
फ क्षेत्रीय -१८
ग क्षेत्रीय -९
ह क्षेत्रीय - २०
एकूण - १४४ नाले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com