कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉनसाठी १३ धावपटू सज्ज

कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉनसाठी १३ धावपटू सज्ज

Published on

पिंपरी, ता. २ : जगातील सर्वांत खडतर अल्ट्रा मॅरेथॉनपैकी एक म्हणून ओळखली जाणारी दक्षिण आफ्रिकेतील ८७ किलोमीटर अंतराची कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन (अप) शर्यतीसाठी शहरातील १३ धावपटू सज्ज झाले असून गुरुवारी (ता.६) दक्षिण आफ्रिकेतील डर्बन शहराकडे रवाना होणार आहेत.
सर्व धावपटूंना शुभेच्छा देण्यासाठी पिंपरी-चिंचवड सायकल क्लबतर्फे दुर्गादेवी टेकडी येथे शनिवारी (ता.१) सकाळी ‘गुडलक रन’चे आयोजन करण्यात आले. पीसीएमसी रनर्सच्या धावपटूंनी त्यांच्यासोबत पाच किलोमीटरची रन करून त्यांना कॉम्रेड शर्यतीसाठी शुभेच्‍छा दिल्या. पिंपरी-चिंचवड सायकलिस्टचे डॉ. धनराज हेळंबे, पीसीएमसी रनर्सचे अविनाश माने, प्रतिमा दोशी यांच्या समवेत ३५ धावपटूंनी त्यात सहभाग घेतला.
शहरातून यंदा डॉ. प्रकाश ठोंबरे, डॉ. धनराज हेळंबे, पांडुरंग बोडके, प्रशांत विनोदे, पोपट कलाटे, रोहित क्षीरसागर, शेखर गवळी, शिवाजी खुळे, संजय सिरसवा, संतोष गायकवाड, मच्छिंद्र शिंदे, वैभव माळी, सचिन कणसे हे तेरा धावपटू मॅरेथॉनसाठी डर्बन ला रवाना होणार आहेत. कॉम्रेडस मॅरेथॉनला नऊ जूनला पहाटे साडेपाच वाजता डर्बन येथून सुरवात होणार असून सेंट पीटर मॅटीजबर्ग येथे तिचा शेवट होणार आहे. यापैकी डॉ. प्रकाश ठोंबरे यांची ही तिसरी कॉम्रेड्स असून डॉ.धनराज हेळंबे, पांडुरंग बोडके, वैभव माळी यांची कॉम्रेड्समध्ये सहभागी होण्याची ही दुसरी वेळ आहे. यंदाच्या अप रन ला ८७ किमी अंतर हे बारा तासांत पूर्ण करण्याचे लक्ष्य धावपटूंनी डोळ्यांसमोर ठेवले आहे. शर्यतीच्या मार्गावर पाच मोठ्या टेकड्या आणि पन्नास लहान टेकड्या असून स्पर्धकांना सतत चढावर धावावे लागते. कमल तिलानी, भूषण तारक, जनार्धन कत्तुल, सचिन वाकडकर यांनी आपले अनुभव सांगून सर्व धावपटूंना शुभेच्छा दिल्या.
PNE24U23545

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com