डोंगरच्या काळ्या मैनेने खाल्ला ‘भाव’

डोंगरच्या काळ्या मैनेने खाल्ला ‘भाव’

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता.२ : आंबट, गोड चवीमुळे लहानमोठ्यांच्या तोंडाला पाणी आणणाऱ्या डोंगरच्या काळ्याभोर टपोरी मैनेचा म्हणजेच करवंदाचा हंगाम सुरू झाला आहे. आंबट, गोड चवीमुळे मोठ्यांनाही तिची भुरळ पडली असून दोनशे ते अडीचशे रुपये किलो या दराने तिची विक्री केली जात आहे.
मावळ तालुक्यातील डोंगरावर मोठ्या प्रमाणावर करवंदाच्या जाळ्या आहेत. यंदा अनुकूल हवामानामुळे करवंदाच्या झुडपांना करवंदे लगडली आहेत. मात्र, डोंगरदऱ्यांत जाऊन काटेरी करवंदाच्या जाळीतील एकेक करवंद तोडून गोळा करणे हे काम जिकीरीचे व कष्टाचे आहे. ग्रामीण भागातील महिला व पुरुष पहाटेच डोंगरावर जाऊन करवंद गोळा करत आहेत. वडेश्वर येथे मुक्कामी आलेल्या एसटी बसने रोज सकाळी सुमारे पंधरा ते वीस महिला करवंदाच्या पाट्या घेऊन शहरी भागात त्याची विक्री करण्यासाठी येत आहेत.
वडेश्वर येथील महिला सुशिला जांभूळकर म्हणाल्या,‘‘ सध्या शेतीची कामे चालू नाहीत. संसाराचा गाडा हाकण्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी करवंदे विकून पैसे मिळवितो. एक पाटी पंधरा ते वीस किलो वजनाची असते. दोनशे ते अडीचशे रुपये किलो या दराने करवंदाची विक्री करून दीड ते दोन हजार रुपये कमावतो. संध्याकाळी त्याच एसटी बसने घरी जातो. या कामात आमचे पतीही हातभार लावतात. पावसाळा सुरू होताच हा व्यवसाय बंद करून शेतीच्या कामाकडे वळावे लागते.’’
PNE24U23546

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com