बालेवाडीत रात्रीपासून
जमाव बंदी आदेश

बालेवाडीत रात्रीपासून जमाव बंदी आदेश

पिंपरी, ता. २ ः मावळ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी मंगळवारी (ता. ४) सकाळी आठपासून बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया शांततेत, निर्भय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून तीन जून रोजी मध्यरात्री बारा वाजल्यापासून (चार जून पहाटेपासून) मतमोजणी संपेपर्यंत शंभर मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया कलम १४४ अर्थात जमाव बंदी आदेश लागू असेल. या परिसरात मोबाईल, लॅपटॉप, आयपॅड, मॅचबॉक्स, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनिक्षेपक, इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, कोणत्याही प्रकारची शस्रे वापरण्यास निर्बंध घालणे आवश्यक आहे. संबंधितांना नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेणे सद्यःस्थितीत शक्य नसल्याने जमाव बंदी आदेश काढला आहे. त्याचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार दंडात्मक कार्यवाही केली जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आदेशात म्हटले आहे.
--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com