आयएएस पंढरपूर वारी २०२४ च्या जर्सीचे अनावरण

आयएएस पंढरपूर वारी २०२४ च्या जर्सीचे अनावरण

पिंपरी, ता. ३ ः इंडो ॲथलेटिक सोसायटीतर्फे (आयएएस), आठव्या पुणे ते पंढरपूर सायकलवारीच्यानिमित्ताने इंडो सायकलपटूंच्या जर्सीचे नुकतेच अनावरण करण्यात आले. येत्या १५ जूनला पहाटे तीन वाजता निगडी येथून सायकल वारीचे प्रस्थान होणार आहे.
याप्रसंगी माजी नगरसेवक अमित गावडे, कीर्तनकार किसन महाराज चौधरी, राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे प्रकाश शेडबाळे, महावितरणचे अधिकारी महेंद्र दिवाकर, इंडो ॲथलेटिक सोसायटीचे सदस्य गजानन खैरे, अजित पाटील, गणेश भुजबळ, सुनील चाको, संजय साठे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेमंतराव हरहरे, उद्योजक अण्णा बिरादार आदी उपस्थित होते. यावेळी किसन महाराज चौधरी यांनी पंढरपूर वारीचे महत्त्व सांगितले. तर अमित गावडे यांनी इंडो ॲथलेटिक्स सोसायटीच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.
संस्थेचे सदस्य गजानन खैरे म्हणाले,‘‘यंदाच्या सायकल वारीत सुमारे १ हजार ७०० सदस्यांनी सहभाग घेतला आहे. पुणे ते पंढरपूर २५० किलोमीटरचे अंतर सर्व सदस्य एका दिवसात पार करणार आहेत. बारा वर्षांपासून ८० वर्षापर्यंतचे सदस्य यामध्ये सहभागी झाले आहेत. या वारीमध्ये मागील वर्षीपेक्षा जास्त म्हणजेच ३७५ महिलांनी सहभाग घेतला आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com