आयटीआयसाठी प्रवेश प्रक्रियेला सुरूवात

आयटीआयसाठी प्रवेश प्रक्रियेला सुरूवात

पिंपरी, ता.३ ः आयटीआय प्रवेश प्रक्रियेला व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने हिरवा कंदिल दाखविला असून त्यानुसार सोमवारपासून (ता.३) ऑनलाइन अर्ज करण्यास सुरवात झाली आहे. यंदा शासकीय, महापालिका आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये १ हजार ७०४ जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.
इयत्ता दहावीच्या निकालानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेशाची प्रक्रिया कधी सुरू होणार ? याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, आता या प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे. शहरातील शासकीय व खासगी मिळून एकूण ५ आयटीआयमधील सुमारे दीड हजारांहून अधिक प्रवेश जागांसाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेशांप्रमाणे ‘आयटीआय’चे प्रवेशही केंद्रीय ऑनलाइन पद्धतीद्वारे होत आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज आणि शुल्क भरून नोंदणी करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये संस्थानिहाय विकल्प आणि प्राधान्यक्रम सादर करता येणार आहेत.

आयटीआय / प्रवेश क्षमता
- निगडी शासकीय आयटीआय / ६५०
- मोरवाडी महापालिका आयटीआय / ५६८
- कासारवाडी मुलींचे आयटीआय / २१६
- डॉन बॉस्को व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र / २४०
- कॅम्प एज्युकेशन खासगी आयटीआय / ३०


निगडी - दुर्गानगर शासकीय आयटीआयमध्ये विविध १४ ट्रेडच्या सुमारे ६५० जागा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्‍यांनी लवकर प्रवेश निश्‍चित करावा. आयटीआयमध्ये कौशल्यांचे प्रशिक्षण मिळत असल्याने नोकरीची शाश्‍वती असते.
- शशिकांत साबळे, प्राचार्य, शासकीय आयटीआय, निगडी

शासकीय धोरणांतर्गत राज्यातील सर्व शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना अत्याधुनिक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. दहावीच्या उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आयटीआयमध्ये प्रवेश घेतल्याने कौशल्य आणि उद्योजकतेचा
चालना मिळत असते.
- सचिन औचारे, समन्वयक, डॉन बॉस्को व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, चिंचवड

विविध अभ्यासक्रमांकडे कल
आयटीआयच्या इलेक्ट्रिशियन, फिटर, मॅकेनिक, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, कॉम्प्युटर ऑपरेटर, वेल्डर यासह महिलांसाठी कॉस्मॉटॉलॉजी, फूड अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, सुईंग टेक्नॉलॉजी आदी अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. नव्याने ऑनलाइन प्रवेश अर्ज करण्‍यासाठी ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com