एकाच छताखाली मिळवा, शिक्षणाचे अनेक पर्याय

एकाच छताखाली मिळवा, शिक्षणाचे अनेक पर्याय

पिंपरी, ता.३ ः सकाळ माध्यम समूहामार्फत ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२४’चे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन ८ ते ९ जून दरम्यान चिंचवड - एम्पायर इस्टेट पुलाजवळील रागा पॅलेस येथे होणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स), एव्हिएशन अशा करियरच्या १०० हून अधिक संधींची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे. प्रदर्शनात विविध शैक्षणिक पर्यायांची माहितीबरोबर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
दहावी-बारावीची परीक्षा दिल्यावर विद्यार्थी आणि पालकांना गरज असते ती ठरविलेल्‍या करिअरबाबत योग्य मार्गदर्शन व माहिती मिळण्याची तसेच योग्य दिशा देणाऱ्या एका मार्गदर्शकाची. त्या पार्श्वभूमीवर, या एज्युकेशन एक्स्पोमध्ये इयत्ता दहावी-बारावीनंतरच्या उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसह पालकांच्या मनातील अनेक प्रश्‍नांची उत्तरे मिळणार आहेत.
दहावी - बारावीनंतरच्या करिअर संधींची माहिती विद्यार्थी आणि पालकांना मिळणार आहे. सर्वोत्तम करिअर निवडताना पालकांची भूमिका, उच्चशिक्षणाचा अभ्यासक्रम आणि महाविद्यालय कसे निवडावे ? कृत्रिम बुद्धिमत्तेचे भविष्य या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

एकाच छताखाली असंख्य पर्यायांची माहिती
कनिष्ठ महाविद्यालयापासून व्यावसायिक अभ्यासक्रमाची, सर्व उपलब्ध करियरच्या पर्यायांची माहिती विद्यार्थी-पालकांना एकाच छताखाली मिळणार आहे. महाविद्यालयीन प्रवेश, दहावी-बारावीनंतर शिक्षणाचे उपलब्ध असणाऱ्या पर्यायाची माहिती; याशिवाय कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, एव्हिएशन, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण यासह अन्य अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थी-पालकांना प्रदर्शनातून घेता येईल. त्याचबरोबर सीईटीसह अन्य स्पर्धा परीक्षांबाबतही येथे मार्गदर्शन मिळणार आहे. सर्व शैक्षणिक पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने हे प्रदर्शन शिक्षण संस्था आणि विद्यार्थी-पालक यांच्यातील दुवा ठरणार आहे. या प्रदर्शनात पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील ३० हून अधिक नामांकित शिक्षण संस्था सहभागी झाल्या आहेत. पिंपरी- चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट प्रस्तुत ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२४’ ला एमआयटी आळंदी कॅम्पस हे सहप्रायोजक आहेत.

यावर नोंदणी करा
‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो या शैक्षणिक प्रदर्शनाला भेट देण्यासाठी या क्युआर कोडवर नोंदणी करा.
२३४०७

काय?, केव्हा?, कधी?, कुठे?
काय? ः सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२४
कधी? ः शनिवार ता. ८ आणि रविवार ता. ९ जून
केव्हा?ः सकाळी ११ ते रात्री ८
कुठे? ः रागा पॅलेस, चिंचवड - एम्पायर इस्टेट पुलाजवळ

अधिक माहितीसाठी
- अमोल ८३७८९८७८३६ आणि सचिन ९७३०९५९६९९
लोगो ः 23413

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com