पिंपरी मावळ बारणे प्रोफाईल

पिंपरी मावळ बारणे प्रोफाईल

नगरसेवक ते हॅटट्रिक
साधणारा खासदार

संपूर्ण नाव ः श्रीरंग चंदू बारणे
जन्म ः १६ फेब्रुवारी १९६४ (वय ६०)
गाव ः थेरगाव (पिंपरी-चिंचवड)
राजकीय पक्ष ः शिवसेना
इतर राजकीय संलग्न पक्ष ः भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट)
पत्नी ः सरिता बारणे
मुले ः दोन
निवासस्थान ः श्री निवास, पद्मजी पेपर मिलजवळ, थेरगाव, पुणे- ४११०३३
शिक्षण ः दहावी
संकेतस्थळ ः shrirangappabarne.com


राजकीय कारकीर्द
-सोळाव्या व सतराव्या लोकसभेचे सदस्य
-अठराव्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून विजयी
-२०१४ च्या निवडणुकीत भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांचा १,५७,३९४ मतांनी पराभव केला.
- २०१४ च्या निवडणुकीत ५,१२,२२३ मते मिळवली.
- २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ अजित पवार यांचा पराभव केला.
-२०१९ च्या निवडणुकीत ७,२०, ६६३ मते मिळवून २,१५,९१३ मतांनी विजयी
-२०२४ च्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा पराभव केला.

संसदेतील कामगिरी ः २०१५, २०१६, २०१७, २०१८, २०१९ मध्ये संसदेतील सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या संसदरत्न पुरस्काराने सन्मानित. २०२० मध्ये ‘संसद महारत्न पुरस्कार’. संसद विशेष रत्न पुरस्कार.

राजकारणातील चढता आलेख
१९९७ ः पिंपरी-चिंचवड महापालिकेत नगरसेवक म्हणून निवड
१९९९ ः पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी निवड
२००२ ः पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुन्हा नगरसेवक म्हणून निवड
२००२-०५ ः विरोधी पक्षनेते-पिंपरी चिंचवड महापालिका व सदस्य पुणे जिल्हा नियोजन समिती
२००७ ः पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुन्हा नगरसेवक म्हणून निवड
२०१२ ः पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुन्हा नगरसेवकपदी निवड
२०१२ ः पिंपरी-चिंचवड महापालिकेत शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड
२०१४ ः सोळाव्या लोकसभेसाठी निवडून आले
एक सप्टेंबर २०१४ पासून पुढे ः सदस्य, संरक्षणविषयक स्थायी समिती सदस्य, रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणीवरील सल्लागार समिती सदस्य, राजभाषेवरील संसदीय समिती
२०१५ ः सोळाव्या लोकसभेच्या पहिल्या चार सत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित
२०१६ ः सोळाव्या लोकसभेच्या (सातव्या अधिवेशनापर्यंत) उत्कृष्ट कामगिरीबद्दल संसदरत्न पुरस्कार
२०१९ ः सतराव्या लोकसभेसाठी पुन्हा निवडून आले
१३ सप्टेंबर २०१९ पासून पुढे ः सदस्य ः अर्थविषयक स्थायी समिती, सदस्य ः पर्यटन संस्कृतीविषयक सल्लागार समिती, सदस्य ः राजभाषा विषयक संसदीय समिती (प्रथम उपसमिती).
२०२० ः सोळाव्या लोकसभेत सातत्यपूर्ण गुणात्मक कामगिरीसाठी ‘संसद महारत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित

श्रीरंग बारणे यांची प्रकाशित पुस्तके
शब्दवेद, समर्थ लढवय्या, आपला वैभवशाली मावळ, मी अनुभवलेली संसद
---

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com