विजयाचे श्रेय मतदार व कार्यकर्त्यांना 
श्रीरंग बारणे यांची भावना ः वाकड ते किवळे मेट्रो मार्ग विकसित करणार

विजयाचे श्रेय मतदार व कार्यकर्त्यांना श्रीरंग बारणे यांची भावना ः वाकड ते किवळे मेट्रो मार्ग विकसित करणार

पिंपरी, ता. ४ : गेली दहा वर्षे मी जनतेशी एकरूप होऊन, काम करत होतो. जनतेच्या अनेक प्रश्‍नांना मी वाचा फोडली. त्यामुळे मावळचा मतदार व जनता ही माझ्या पाठीशी राहिली. या विजयाचे श्रेय मी माझ्या मतदारांना व कार्यकर्त्यांना देतो, अशा भावना शिवसेनेचे विजयी उमेदवार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केल्या.
विजय स्पष्ट झाल्यावर श्रीरंग बारणे हे मतमोजणी केंद्रावर दाखल झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘विरोधी पक्षाच्या उमेदवाराकडे दाखविण्यासाठी कोणतेही काम नव्हते. त्यामुळे त्यांनी माझ्यावर निवडणुकीत अनेक आरोप करून, वेगळे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जनतेने त्यांना जागा दाखवली.’’
बारणे म्हणाले,‘‘मोठ्या फरकाने निवडून येणार, हे मी आधीच सांगितले होते. मावळच्या जनतेने माझ्यावर विश्‍वास टाकून, हा कौल दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी माझ्यावर विश्‍वास टाकला. मावळ मतदार संघातील सर्व आमदार व कार्यकर्ते यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्याचा हा विजय आहे. २००९ मध्ये पिंपरी चिंचवड शहरातील जनतेने माझ्यावर खूप मोठा विश्‍वास टाकला. मी त्यांचे नम्रपणे आभार मानतो. राज्यातील चित्र वेगळे असताना मोठ्या फरकाने विजय झालेला आहे. हा विजय जनतेचा आहे. मावळ मतदारसंघातील मतदारांना हा विजय मी समर्पित करतो.’’

रेल्वे ट्रॅक विकसित करणार

शहरात रेल्वेचा तिसरा, चौथा ट्रॅक विकसित करणे, पवना व इंद्रायणी सुधार प्रकल्प, तळेगाव ते शिक्रापूर या रस्त्याचे काम, देहूरोड सेंट्रल पॉइंट ते वाकडपर्यंतचा एलिवेटेड कॉरिडॉर, खालापूर ते उरण हा मार्ग, खोपोली मार्गाचे रुंदीकरण असे अनेक हाती घेतलेले प्रकल्प मी पूर्णत्वास नेणार आहे. भक्ती शक्ती ते किवळे चौक मार्गे वाकड व वाकड ते चाकण मेट्रो प्रकल्पासाठी आग्रही राहणार आहे. तसेच पिंपरी चिंचवड महापालिका व पीएमआरडीए यांच्या मदतीने नव्याने विकसित होणाऱ्या उपनगराच्या विकासाठी प्रयत्न करू, असे बारणे यांनी सांगितले.
......

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com