पनवेलमधून बारणेंना ३१ हजार मतांची आघाडी

पनवेलमधून बारणेंना ३१ हजार मतांची आघाडी

पनवेल ता. ४ ः पनवेलमधून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना १,५०,९२४ तर महाविकास आघाडीचे उमेदवार वाघेरे यांना १,१९,८८६ मते मिळाली. पनवेलमधून बारणे यांना ३१ हजार ३८ इतके मताधिक्य मिळाले. राज्यात महायुतीचा धुव्वा उडाल्याने महायुतीच्या पनवेलच्या पदाधिकाऱ्यांनी बारणे यांच्या विजयाचा जल्लोष सायंकाळपर्यंत साजरा करण्याचे टाळले.
शिवसेनेचे पनवेलमधील मध्यवर्ती कार्यालय कळंबोली वसाहतीमध्ये आहे. शिवसेनेचे पनवेल जिल्हाध्यक्ष रामदास शेवाळे यांनी मध्यवर्ती कार्यालयासमोर डीजे लावून गुलालाच्या उधळणीत पेढे वाटून आनंद साजरा केला. महायुतीच्या अनेक उमेदवारांचा झालेल्या पराभवामुळे पनवेल भाजपने सुद्धा सावध पवित्रा घेत कोणताही जल्लोष सायंकाळी साडेसहावाजेपर्यंत तरी साजरा केला नव्हता. लोकसभा निवडणुकीचा निकाल टिव्हीवर जसजसा जाहीर झाला. राज्यात व देशात महायुतीच्या अपेक्षित यश न आल्याच्या बातम्या समजल्याने पनवेलमधील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष टाळल्याचे चित्र होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com