ऑनलाइन गंडा घालणारी टोळी जेरबंद

ऑनलाइन गंडा घालणारी टोळी जेरबंद

पिंपरी, ता. ५ : अर्धवेळ काम देण्याच्या बहाण्याने एका तरुणाची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आठ जणांच्या टोळीला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली. फसवणुकीची घटना १३ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत रावेत येथे घडली.
अल्ताफ मेहबूब शेख (वय २४, रा. जुनी सांगवी), मनोज शिवाजी गायकवाड (वय २३, रा. दापोडी), अनिकेत भाऊराव गायकवाड (वय २२, रा. नवी सांगवी), पवन विश्वास पाटील (वय २२, रा. पिंपरी), चैतन्य संतोष आबनावे (वय २१, रा. पिंपळे गुरव), सौरभ रमेश विश्वकर्मा (वय २३, रा. पिंपळे गुरव), कृष्णा भगवान खेडकर (वय २७, रा. घाटशीळ पारगाव, ता. शिरूर) आणि हाफीज अली अहमद शेख (रा. दापोडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी नडीगड्डा बाबू चीनमस्तन (वय २६, रा. रावेत. मूळ रा. आंध्र प्रदेश) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या व्हॉटसॲपवर आरोपींनी ऑनलाइन अर्धवेळ काम करण्याबाबत लिंक पाठवली. त्यातून त्यांना टेलिग्रामवर एका ग्रुपमध्ये समावून घेत विशिष्ट खरेदी करण्याचे सांगून त्यांच्याकडून ३३ हजार रुपये घेतले. त्यावर त्यांना पाच हजार रुपये नफा देणार असल्याचे आरोपींनी सांगितले होते. पैसे घेतल्यानंतर आरोपींनी नफा अथवा गुंतवलेली रक्कम न देता फसवणूक केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com