पिंपरी-चिंचवडमधील चौघांकडून हॅम्बर्ग आयर्नमॅन पूर्ण

पिंपरी-चिंचवडमधील चौघांकडून हॅम्बर्ग आयर्नमॅन पूर्ण

पिंपरी, ता. ५ ः पिंपरी-चिंचवड शहरातील डॉ.सलील पाटील यांच्यासह एकूण चार ॲथलिटसने जर्मनीमधील हॅम्बर्ग येथील युरोपियन आयर्नमॅन अजिंक्यपद शर्यत निर्धारित वेळेत यशस्वीरित्या पूर्ण केली. डॉ.पाटील यांनी ११ तास २९ मिनिटांत शर्यत पूर्ण करत शहरातील सर्वात वेगवान ॲथलिटचा बहुमान मिळविला.
याशिवाय, पिंपरी-चिंचवडमधील केतन चौधरी, भरत गोळे आणि सुरेश पेठे (वय ६०) यांनीही ही शर्यत वेळेत पूर्ण करत यश मिळविले. या शर्यतीत हाड गोठवणाऱ्या थंडीत ३.८ किमी पोहणे, १८० किलोमीटर सायकल चालवणे आणि ४२.२ किलोमीटर धावणे असा खडतर प्रवास पूर्ण करणे आवश्यक होते. हे अंतर चौघांनी निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण केले. या चौघांपैकी डॉ.पाटील यांनी ११ तास २९ मिनिटे २९ सेकंद अशी वेळ नोंदवत शहरातील सर्वात वेगवान आयर्नमॅन होण्याचा मान मिळविला.

डॉ. सलील पाटील ः ३५ ते ३९ वर्षे गट ः जलतरण - १ तास ११ मिनिटे ३५ सेकंद सायकलिंग - ५ तास ५० मिनिटे ११ सेकंद
धावणे - ४ तास ७ मिनिटे १ सेकंद
- एकूण ११ तास २९ मिनिटे २९ सेकंद

केतन चौधरी ः ४० ते ४४ वर्षे गट ः जलतरण - १ तास ४४ मिनिटे ३३ सेकंद
सायकलिंग ः ६ तास ३१ मिनिटे ४७ सेकंद
धावणे ः ४ तास १८ मिनिटे ४१ सेकंद
- एकूण १२ तास ५२ मिनिटे ३३ सेकंद

भरत गोळे ः ५५ ते ५९ वर्षे गट ः जलतरण - २ तास ३ मिनिटे २७ सेकंद
सायकलिंग ः ७ तास १३ मिनिटे ५३ सेकंद
धावणे ः ५ तास १५ मिनिटे ४४
- एकूण १४ तास ५८ मिनिटे ४६ सेकंद

यापूर्वी अर्ध आयर्नमॅनच्या शर्यतीत भाग घेतला होता. मात्र, हॅम्बर्गमधील पूर्ण अंतराच्या शर्यतीचा छान अनुभव मिळाला. जागतिक पातळीवरील ॲथलिटसने शर्यतीत भाग घेतला. तेथील स्थानिक नागरिक, संयोजकांकडून चांगले प्रोत्साहन मिळाले. खूप मजा आली. सर्वांनी शर्यतीचा आनंद घेतला.
- डॉ.सलील पाटील, आयर्नमॅन, हॅम्बर्ग

हॅम्बर्ग येथील आयर्नमॅन शर्यत ही माझी पहिली पूर्ण शर्यत ठरली. यापूर्वी अर्ध आयर्नमॅन आणि ३/४ आयर्नमॅन शर्यत पूर्ण केली होती. या दोन्ही ठिकाणचा अनुभव मला कामाला आला.
- केतन चौधरी, आयर्नमॅन, हॅम्बर्ग

खूप सुंदर अनुभव राहिला. पाणी छान असल्याने जलतरणाचा मनापासून आनंद घेता आला. मात्र, वाऱ्याच्या वेगामुळे सर्वांनाच सायकलिंग करणे अवघड गेले.
- सुरेश पेठे, आयर्नमॅन, हॅम्बर्ग
PNE24U24230

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com