औषध, चाऱ्यांच्या खर्चाने दुधउत्पादक मेटाकुटीला

औषध, चाऱ्यांच्या खर्चाने दुधउत्पादक मेटाकुटीला

सोमाटणे, ता.६ ः डोंगरदऱ्यातील चाऱ्याचे क्षेत्र कमी होणे, जनावरांचे आजार, औषध आणि चाऱ्याच्या वाढत्या खर्चाने दुग्धउत्पादक शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे, त्यांना आता पावसाची प्रतिक्षा लागली आहे.
मावळ तालुक्यात शेतीला जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणावर दुग्ध व्यवसाय केला जातो. पावसाळ्यात डोंगरदऱ्यात जनावरांसाठी मुबलक चारा मिळत असल्याने शेतकऱ्यांना हा व्यवसाय चांगले उत्पन्न आणि उत्पादन मिळवून देणारा ठरला आहे. परंतु, यावर्षी तापमानवाढीमुळे जनावरांच्या औषधाचा खर्च वाढला असून कडक उन्हामुळे गायी, म्हशींना चरण्यासाठी डोंगरदऱ्यात घेऊन जाणे कठीण झाले आहे. त्यामुळे, त्यांना घरीच चारा खाऊ घालावा लागत आहे. त्यातच खुराक व चाऱ्याच्या किमतीही दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत. मजुरांचे दरही वाढले. परंतु दुधाच्या दरात फारशी वाढ झाली. त्यामुळे, सध्या या व्यवसायामधून फक्त खर्चच भागात असल्याने हा व्यवसाय अडचणीत आला आला आहे.
पावसाची प्रतिक्षा पावसाळा तोंडावर आला असून लवकर पावसाला सुरूवात झाल्यास शेतकऱ्यांच्या चाऱ्याचा खर्च वाचणार आहे. त्यामुळे, उत्पादन फायदेशीर होणार असल्याने त्यांना पावसाची प्रतिक्षा लागली आहे.

आधीच चाऱ्याची उपलब्धता कमी, त्यातच औषध व खुराकाच्या किमती दहा टक्क्यांनी वाढल्याने शेतकरी अडचणीत आले.
- शेखर मुऱ्हे, खाद्य व खुराक पुरवठादार, सोमाटणे.

वाढत्या तापमानामुळे जनावरांचा आजार वाढला परिणामी औषधाचा खर्च वाढल्याने शेतकरी अडचणीत आले.
- नितीन बोडके, शेतकरी, गहुंजे.

डोंगरदऱ्यापर्यंत शेती, फार्महाऊस वाढल्याने चाऱ्याचे क्षेत्र कमी झाल्याने अनेक गावातील शेतकऱ्यांना पावसाळ्यातही विकतच घ्यावा लागतो.
- पांडुरंग शिंदे, शेतकरी, चांदखेड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com