श्रीरंग बारणे यांच्या विजयात 
पडद्यामागील टीमचा मोठा वाटा

श्रीरंग बारणे यांच्या विजयात पडद्यामागील टीमचा मोठा वाटा

पिंपरी, ता. ७ : लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून दररोजच्या प्रचाराचे नियोजन करणे, मित्र पक्षांतील नेत्यांशी समन्वय साधणे, रात्रीचा दिवस करून एकदिलाने काम करणाऱ्या पडद्यामागील टीमचा खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयात मोठा वाटा आहे. पडद्यामागे राहून बांधकाम व्यावसायिक रवी नामदे यांनी आवश्यक ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघातील विजय महायुतीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदारांना समर्पित केल्याचे बारणे यांनी म्हटले आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या प्रचंड मेहनतीच्या जोरावरच बारणे यांनी हॅटट्रिक केली. परंतु, प्रचाराचे नियोजन करण्यापासून पडद्यामागे राहून सर्व जबाबदारी पार पाडणाऱ्या ‘बॅक’ टीमचेही तितकेच मोठे योगदान राहिले. या टीममध्ये माजी नगरसेवक प्रमोद कुटे, नीलेश बारणे, सरिता साने, धनाजी बारणे, बाळासाहेब वाघमोडे, उदय आवटे यांचाही महत्त्वाचा सहभाग आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com