घरांवर दगड मारून
माजवली दहशत

घरांवर दगड मारून माजवली दहशत

पिंपरी, ता. ७ : गांजा दे किंवा दारू पाज असे म्हणत एकाने तरुणाला शिवीगाळ करीत डोक्यात वीट मारून जखमी केले. मी इथला भाई आहे, असे म्हणत परिसरातील घरांवर दगड मारून दहशत माजवल्याचा प्रकार चाकणजवळील भोसे येथे घडला.
गणेश धर्मराज बागल (रा. काळूसरोड, भोसे, ता. खेड. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मोन्या ऊर्फ ओंकार नवनाथ पहाड (रा. भोसे, ता. खेड, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने फिर्यादी व साक्षीदार यांना काळूसरोड येथे थांबवले. गांजा दे किंवा दारू पाज, तुला येथून जाऊ देणार नाही, असे आरोपी म्हणाला. त्यानंतर फिर्यादी व साक्षीदार तेथून निघाले असता, पाठीमागून आलेल्या आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात वीट मारून शिवीगाळ केली. त्यानंतर आजूबाजूच्या घरांवर दगड, विटा मारल्या. यामुळे परिसरात दहशत निर्माण झाल्याने लोकांची धावपळ उडाली.
------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com