संरक्षण विभागाचा ट्रक पलटी झाल्याने वाहतूक कोंडी

संरक्षण विभागाचा ट्रक पलटी झाल्याने वाहतूक कोंडी

संरक्षण विभागाचा ट्रक उलटल्याने वाहतूक कोंडी

दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात घटना; ऑइल रस्त्यावर सांडले
पिंपरी, ता. ३० : पुणे-मुंबई महामार्गावर मोरवाडी येथे ग्रेडसेपरेटरमध्ये संरक्षण विभागाचा ट्रक उलटला. मंगळवारी (ता. ३०) दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. ट्रक रस्त्यावरच आडवा झाल्याने या मार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली. क्रेनच्या साह्याने ट्रक बाजूला घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
संरक्षण विभागाचा ट्रक पुण्याहून निगडीच्या दिशेने जात असताना मोरवाडी येथे ट्रकसमोर अचानक एक दुचाकी आली. दुचाकीला वाचविण्यासाठी चालकाने ट्रक वळविला असता ट्रक उलटला. अपघातग्रस्त ट्रकमधील ऑइल रस्त्यावर सांडले. यामुळे पुणे-मुंबई मार्गावर दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिस तसेच वाहतूक विभागाचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी खराळवाडी येथून महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्याने वळवली. क्रेनच्या साहाय्याने उलटलेला ट्रक बाजूला घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com