तेवीस वर्षानंतर भेटले वर्ग मित्र-मैत्रिणी

तेवीस वर्षानंतर भेटले वर्ग मित्र-मैत्रिणी

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. २ ः ॲड. पु. वा. परांजपे विद्या मंदिरामध्ये तेवीस वर्षांनंतर दहावीचा वर्ग पुन्हा भरला. सन २०००- ०१ या शैक्षणिक वर्षात दहावीत शिकणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत शाळेत स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. तेवीस वर्षांपूर्वीची शाळा, शिक्षक आणि शाळेतल्या आठवणींना विद्यार्थ्यांनी उजाळा दिला. राज्यासह बाहेर देशात कामानिमित्त असलेले विद्यार्थी स्नेहमेळाव्यासाठी एकत्र आले होते. स्नेहमेळाव्यात विद्यार्थी व शिक्षकांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उपयोगी वस्तू शाळेस भेट दिल्या. संदीप सातकर , गीतांजली खांदवे, मोनाली थोरवे, प्रवीण गरुड, अभिजित चौधरी, प्रशांत ठोके, गोकूळ किरवे, आरती राणा, गिरीश चौरे, महेश गंगाप्रसाद, आविष्कार कबाडे, रोहीत कुलकर्णी, मनीष मेंढी, अनिता धामणकर, प्रसाद सावंत, दीप्ती खानविलकर यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. शाळेच्यावतीने मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
PNE24U16987

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com