मतदान यंत्रांची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

मतदान यंत्रांची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

पिंपरी, ता. २ ः मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान यंत्रांची संगणकीय प्रणालीद्वारे द्वितीय सरमिसळ (रॅंडमायझेशन) प्रक्रिया पूर्ण झाली. यामध्ये पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघनिहाय राखीव यंत्रांसह आवश्यक असलेल्या मतदान यंत्रांचा समावेश होता.
मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात (पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण इमारत, आकुर्डी- प्राधिकरण) सरमिसळ प्रक्रिया झाली. निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर, निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, ईव्हीएम नोडल अधिकारी रूपाली आवले, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाचे समन्वय अधिकारी प्रवीण ठाकरे, हिम्मत खराडे, माहिती व तंत्रज्ञान कक्षाचे समन्वय अधिकारी निळकंठ पोमण, निवडणूक सहायक अभिजित जगताप, सचिन मस्के, मावळ विधानसभा निवडणूक कार्यालयाच्या समन्वय अधिकारी पूनम कदम, चिंचवड विधानसभा निवडणूक कार्यालयाचे अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम, पिंपरी विधानसभा निवडणूक कार्यालयाचे अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जयराम देशमुख, पनवेल विधानसभा निवडणूक कार्यालयाचे प्रतिनिधी विनय पाटील यांच्यासह उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मावळ मतदारसंघासाठी यंत्र
मतदान केंद्र ः २,५६६
बॅलेट युनिट ः ९,२३६
कंट्रोल युनिट ः ३,५९१
व्हीव्हीपॅट ः ३,८१६

मावळ लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय यंत्र
मतदारसंघ / मतदान केंद्र / बॅलेट युनिट / कंट्रोल युनिट / व्हीव्हीपॅट
पनवेल / ५४४ / १,९५८ / ७५० / ७८८
कर्जत / ३३९ / १,२२० / ४६७ / ४९१
उरण / ३४४ / १,२३८ / ४७४ / ४९८
मावळ / ३९० / १,४०४ / ५५३ / ५९२
चिंचवड / ५४९ / १,९७६ / ७७९ / ८३९
पिंपरी / ४०० / १,४४० / ५६८ / ६०८
---

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com