उद्योगनगरीत कामगार दिन उत्साहात

उद्योगनगरीत कामगार दिन उत्साहात

पिंपरी, ता. २ ः पिंपरी-चिंचवड शहरातील विविध कष्टकरी व कामगार संघटना, संस्था यांच्या वतीने कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त कामगार बंधू-भगिनींचा सन्मान, ध्वजवंदन, मतदानाची शपथ आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने राज्य स्थापनेचा ६४ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. बुधवारी (ता. १) पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी उपस्थितांकडून मतदानाचीही शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले, मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर, उपायुक्त मनोज लोणकर, संदीप खोत, रविकिरण घोडके, अण्णा बोदडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

कामगार बंधू व भगिनींचा सन्मान
फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्यावतीने कामगार दिनानिमित्त कामगार बंधू आणि भगिनींचा सन्मान करण्यात आला. यावेळी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत असणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक संतोष इंगळे, दुर्गा ब्रिगेड संघटनेचे पदाधिकारी, उद्योजक व कामगार उपस्थित होते. भावी पिढीसमोर महाराष्ट्राचा इतिहास मांडला गेला पाहिजे. त्यासाठी शालेय अभ्यासक्रमामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास समाविष्ट करावा, अशी मागणी असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी केली.

आनंद हास्य योग क्लबतर्फे मिरवणूक
पिंपळे सौदागर येथील आनंद हास्य योगा क्लबच्यावतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त संजय भिसे व उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांच्या हस्ते कुंजीर क्रीडांगणाची देखभाल करणारे कामगार अजय धायगुडे, सौरभ परघळे व गणेश यादव यांचा सत्कार करण्यात आला. भामिनी महाळे यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. यावेळी हास्य क्लबच्या सदस्यांनी क्रीडांगणाच्या परिसरात मिरवणूक काढण्यात आली. नीता गुप्ता यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी अनिल कुलकर्णी, संतोष वर्तक, विमल मोंढेकर, अशोक उगिले, शोभा राजगुरू, सुनीता जैस्वाल यांनी परिश्रम घेतले.

संत तुकारामनगर येथे कामगार दिन साजरा
राज्य कामगार कल्याण मंडळाच्यावतीने, संत तुकारामनगर येथे जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. यावेळी कामगार नेते अरूण बोराडे, सुरेश कंक, शिवाजीराव शिर्के आदींनी मार्गदर्शन केले. केंद्र संचालक अनिल कारळे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन जास्तीत जास्त कामगारांनी शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
यावेळी अमित निंबाळकर, सुभाष चव्हाण, अण्णा गुरव, प्रकाश घोरपडे, शंकर नाणेकर, पंकज पाटील, गोरख वाघमारे, सुरेखा मोरे, संगीता क्षिरसागर, किरण कोळेकर, दिनकर पाटील, आनंद निकम, विकास कोरे, बाळासाहेब साळुंके, श्यामराव गायकवाड आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com