मराठी चित्रपटांवर मराठी रसिकांचेच प्रेम कमी
मृणाल कुलकर्णी यांची खंत ः कलाविभूषण पुरस्कार प्रदान

मराठी चित्रपटांवर मराठी रसिकांचेच प्रेम कमी मृणाल कुलकर्णी यांची खंत ः कलाविभूषण पुरस्कार प्रदान

पिंपरी,ता. २ ः मराठी चित्रपट अमराठी रसिकांमध्ये कमालीचा प्रसिद्ध आहे. अमराठी रसिक सब टायटल दिलेले मराठी सिनेमा आवडीने बघतात. मात्र, मराठी रसिकांचे मराठी चित्रपटांवर कुठेतरी प्रेम कमी पडत आहे, अशी खंत प्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
पिंपरी चिंचवड कल्चरल फाउंडेशनच्यावतीने मृणाल कुलकर्णी यांना कलाविभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड कल्चरल फाउंडेशनचे अध्यक्ष विजय भिसे यांनी घेतलेल्या मुलाखती दरम्यान त्या बोलत होत्या. निगडीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यास पद्मश्री गिरीश प्रभुणे, शेखर महाराज जांभूळकर, नाना काटे, विक्रम शिरसाट, पं. रवींद्र गांगुर्डे, संतोष काटे, धनंजय भिसे, अरुण चाबूकस्वार आदी उपस्थित होते.
मृणाल कुलकर्णी म्हणाल्या,‘‘एकावेळी मल्टिप्लेक्समध्ये जर तीन सिनेमे लागले असतील तर मराठी रसिक सर्वप्रथम हिंदी सिनेमा बघण्याला प्राधान्य देतो. नंतर एखादा पुरस्कार विजेता मग शेवटी मराठी बघू असे तो ठरवतो. मात्र शनिवारी- रविवारी सिनेमासाठी गर्दी झाली नाही तर सिनेमा चित्रपटगृहातून काढला जातो. आपण आपल्या मराठी सिनेमावर प्रेम करायला कुठेतरी कमी पडत आहोत. मात्र दाक्षिणात्य रसिक सर्वप्रथम मातृभाषेतील सिनेमाला प्राधान्य देतात. त्यामुळे ते सिनेमे प्रचंड चालतात.’’

माझे आजोबा साहित्यिक गो. नी. दांडेकर यांचे माझ्यावर साहित्य आणि इतिहासाचे संस्कार झालेत. त्याचा उपयोग मला ऐतिहासिक भूमिका साकारताना आणि दिग्दर्शन करताना झाला. आपणदेखील आपल्या मुलांसोबत ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या पाहिजेत, असेही मृणाल कुलकर्णी म्हणाल्या.
संतोष घुले आणि ओमकार दीक्षित यांनी सूत्रसंचालन केले. सतीश इंगळे यांनी आभार मानले.

फोटोः 17118
-------------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com