सराईत गुन्हेगाराचा रहाटणीत भरदिवसा खून

सराईत गुन्हेगाराचा रहाटणीत भरदिवसा खून

पिंपरी, ता. २ : पूर्ववैमनस्यातून सात जणांच्या टोळक्याने भरदिवसा सराईत गुन्हेगाराचा कोयता आणि चाकूने सपासप वार करून निर्घृण खून केला. ही घटना रहाटणी येथे घडली.
रेहान अरिफ शेख (वय १९, रा. पिंपळे गुरव) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी ऋतिक चव्हाण, प्रेम मोरे, दीपक कोकाटे व इतर चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी तेजस मनोहर हंसकर (रा. जुनी सांगवी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रेहान व आरोपी यांच्यात पूर्ववैमनस्य होते. दरम्यान, बुधवारी (ता. १) सायंकाळी सहाच्या सुमारास फिर्यादी तेजस, त्याचे मित्र रेहान आणि हर्षद काटे हे दुचाकीवरून औंध-रावेत रस्त्याने रावेतला चालले होते. त्यावेळी, पार्क स्ट्रीट सोसायटीसमोरील पुलावर पाठीमागून तीन दुचाकींवर आरोपी आले. आरोपींनी रस्ता अडवून रेहानला घेराव घातला. ऋतिक चव्हाण याने त्याच्याकडील चाकूने रेहान याच्या गळ्यावर व मानेवर सपासप वार केले. तसेच दीपक कोकाटे याने कोयत्याने रेहान याच्या मानेवर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने रेहानचा मृत्यू झाला. रेहान शेख याच्यावर विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com