बीआरटी मार्गिकेत खासगी वाहनांची घुसखोरी सुरुच

बीआरटी मार्गिकेत खासगी वाहनांची घुसखोरी सुरुच

निगडी-आकुर्डी मार्गावर असलेल्या बीआरटी मार्गिकेत पीएमपी बसशिवाय घुसखोरी करणाऱ्या इतर वाहनांच्या घुसखोरीबद्दल काही दिवसांपूर्वी मी लिहिले होते. त्यानंतर केवळ एक दिवस काही ठिकाणी पोलिस अशा बेशिस्त वाहनचालकांकडून दंड वसूल करताना दिसले. मात्र, आता काही वाहनचालक आपली वाहने बीआरटी मार्गिकेतून सर्रासपणे नेत आहेत. यामुळे या नियम मोडणाऱ्या वाहनचालकांबरोबरच, वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या वाहनचालकांनाही मोठा धोका निर्माण झाला आहे. यामुळे गंभीर अपघात होण्याआधीच संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी.
- शिवराम वैद्य, निगडी,

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com