नेहरूनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्राची दुरवस्था

नेहरूनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्राची दुरवस्था

Published on

आशा साळवी ः सकाळ वृत्तसेवा

पिंपरी, ता. ३१ ः नेहरू नगरमधील व्यायाम शाळेत आम्हाला स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून विरंगुळा केंद्र उपलब्ध केले आहे. मात्र, या विरंगुळा केंद्राची दुरवस्था झाली आहे. छताला गळती लागली असून केंद्राची वायरिंग लटकत आहे आणि भिंतीचा रंग उडालेला आहे. पावसाच्या पाण्यामुळे भिंतीचे पापुद्रे निघत आहेत. विरंगुळा केंद्राची दुरवस्था झाली आहे. अशी व्यथा नेहरूनगर ज्येष्ठ नागरिक संघ उत्तर विभागाच्या सदस्‍यांनी ‘सकाळ’च्या ‘संवाद ज्येष्ठांशी’ या उपक्रमात मांडली.

नेहरूनगर येथील विरंगुळा केंद्रात ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने ज्‍येष्ठांशी संवाद साधला. यावेळी अध्यक्ष गुंडाप्पा टेकुर, उपाध्यक्ष शंकर नलावडे, खजिनदार पोपट आढाव, उपखजिनदार अमर परदेशी, सचिव चंद्रशेखर मुधोळकर, सहसचिव सुभाष जाधव, नाथाजी निकम, शंकर कुंभार, सल्लागार राणू ठोकळ, सदस्य व्ही. डी. सिंग, एस. एस. कुंभार, बाळासाहेब पाटील, काशिनाथ भडवळकर, आर. डी. जाधव, कुटाप्पा टाकळ, शंकर पाटील, बबन रेकावार, पी. डी.पाटील, भास्कर गायकवाड, सुमन देवकुळे, शारदा कदम, तुकाराम नेरकर, दगडू गायकवाड आदी उपस्थित होते.

आकडे बोलतात...
संघ स्थापना ः २२ ऑगस्ट २००७
पुरुष संख्या ः ८२
महिला संख्या ः १४
सभासद संख्या ः ९६

संघाचे उपक्रम...
- संघाचा वर्धापन दिन
- साहित्‍य कट्टा, व्यायाम कट्टा, सांस्कृतिक कट्टा
- सभासदांचे वाढदिवस साजरे
- गणेश उत्सव, नवरात्र उत्सव
- गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा
- धार्मिक व निसर्गरम्य वार्षिक सहली
- ठिकठिकाणी वृक्षारोपण करणे
- आरोग्य तपासणी शिबिर
- महिला दिन उपक्रम
- आषाढी एकादशीची वारी
- राष्ट्रीय सण
- ज्येष्ठ नागरिक दिन
- विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन
- विविध विषयांवर व्याख्याने

ज्येष्ठांच्या मागण्या...
व्ही. डी. सिंग ः विरंगुळा केंद्राच्या भोवतालच्या उद्यानात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. नियमित स्वच्छता करण्याची आवश्‍यकता आहे.
विष्णू गायकवाड ः विरंगुळा केंद्राला वॉटरप्रुफ करण्याची गरज आहे. भिंतीतून पाणी झिरपत असल्यामुळे वास येतो.’’
पोपट आढाव ः विरंगुळा केंद्राचे रंगकाम करणे आवश्‍यक आहे. रंगहीन भिंती आहेत.
चंद्रशेखर मुधोळकर ः महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असावे.
भास्कर गायकवाड ः उद्यानातील स्वच्छतागृहाचा दरवाजा लावावा.
एस. एस. कुंभार ः ज्‍येष्ठ नागरिकांना गायन, वादनाचे साहित्‍य, संगीत वाद्ये दिली जावीत.
सुभाष जाधव ः इपीएस ९५ ज्येष्‍ठांना पेन्शन सुरू करावी.
आर. डी. जाधव ः भटकी कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. महापालिकेने त्याचा बंदोबस्त करावा.

‘‘या जागेत पूर्वी व्यायाम शाळा भरत होती. काही वर्षापूर्वी ही जागा विरंगुळा केंद्र म्हणून आम्हाला देण्यात आली. त्याबद्दल आनंद आहे. परंतु, विविध सुविधा नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत. विरंगुळा केंद्राची दुरवस्था दूर करावी.
- गुंडाप्पा टेकुर, अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ नेहरू नगर, उत्तर विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com