कुर्बानीसाठी पुरेशी जागा, पाणी व्यवस्था

कुर्बानीसाठी पुरेशी जागा, पाणी व्यवस्था

पिंपरी, ता. ९ ः बकरी ईदसाठी महापालिकेतर्फे तात्पुरत्या स्वरुपातील पत्राशेड आणि मंडप उभारण्यात येणार आहेत. कुर्बानीच्या ठिकाणी आवश्यक साहित्य, मोबाईल टॉयलेट व्हॅन इत्यादी सुविधा असतील. तसेच, कुर्बानीसाठीच्या जनावरांना ठेवण्यासाठी पुरेशी जागा आणि पाण्याच्या व्यवस्थेसाठी टँकर व स्वतंत्र हौद उभारण्यात येत आहेत, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.

बकरी ईदच्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे सर्व संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांनी समन्वय साधून पुरविण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असा आदेशही त्यांनी दिला. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, उल्हास जगताप, स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित खुळे, किरण पठारे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये इर्शाद कुरेशी, मुबीन कुरेशी, शब्दुल्ला काजी, नियाज देसाई, रौफ कुरेशी, नादिर बैग, गफूर कुरेशी आदींचा सहभाग होता.

बकरी ईदनिमित्त मागण्या
मागील वर्षीपेक्षा यावर्षी पाण्याचा पुरवठा अधिक प्रमाणात करण्यात यावा, जनावरे बांधण्यासाठी अधिकची जागा उपलब्ध करून द्यावी, मंडपाच्या किंवा पत्राशेडच्या ठिकाणी वेळोवेळी स्वच्छता करण्यात यावी, बकरी ईदसाठी मुस्लिम बांधवांना कायमस्वरूपी व्यवस्था करावी, कुर्बानीसाठी चार दिवसांची मुदत द्यावी, आदी मागण्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी केल्या.

महापालिकेकडून पूर्तता
बकरी ईदच्या कुर्बानीनंतर निर्माण होणारे वेस्ट तत्काळ उचलण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रणांची व्यवस्था केली जाईल. वीजपुरवठा व जनरेटरची सुविधा असेल. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व व्यवस्था केली असून, आवश्यक पोलिस यंत्रणा तैनात आहे. तसेच सीसीटीव्ही यंत्रणाही बसविण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
---

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com