पिंपरी कॉलेज कट्टा

पिंपरी कॉलेज कट्टा

‘पूल कॅम्पस ड्राइव्ह’ मुळे
विद्यार्थ्यांना नोकरीची संधी
ऋतुजा लोहार (मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी फॉर लेडीज, मोशी)

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मोशी येथील मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी फॉर लेडीज येथे टेककेअर मेडिकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (टीसीएमएस) या कंपनीच्या ‘मेडिकल रेकॉर्ड एक्झिक्युटिव्ह’ पदासाठी ‘पूल कॅम्पस ड्राइव्ह’ आयोजित केले. या कॅम्पस ड्राइव्हसाठी राज्यातील विविध कॉलेजमधील अंतिम वर्षाचे विद्यार्थी आणि उत्तीर्ण झालेल्या विविध कोर्सेसचे (डी.फार्म, बी.फार्म, एम.फार्म, फार्म.डी आणि बी. एससी) एकूण ७७५ नोंदणी प्राप्त झाल्या होत्या. ड्राइव्हचे उद्‍घाटन आणि मुलाखत पॅनल सदस्यांचे सत्कार प्राचार्य डॉ. एस. एन. ढोले यांच्या हस्ते झाले. टीसीएमएसच्या सहाय्यक व्यवस्थापक (एचआर) आरती व्यास यांनी कंपनीचे अवलोकन, नोकरी प्रोफाइल आणि मुलाखत प्रक्रिया याबद्दल मार्गदर्शन केले. २५७ विद्यार्थी पहिल्या फेरीच्या मुलाखतीसाठी (अभिक्षमता चाचणी) उपस्थित होते. दुसऱ्या फेरीसाठी ५४ उमेदवारांची निवड झाली. त्यांची मुलाखत टीसीएमएस पॅनलने घेतली. त्यात ४४ विद्यार्थ्यांची मुंबई येथील टीसीएमएस कार्यालयात होणाऱ्या तांत्रिक फेरीसाठी निवड झाली. टीसीएमएसकडून व्यास, सुश्री उमा संकद आणि सिद्धार्थ सांगरे यांचा मुलाखत पॅनलमध्ये समावेश होता. संपूर्ण कॅम्पस ड्राइव्हचे समन्वयक महाविद्यालयाचे प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी डॉ. राहुल शिवरकर, धनश्री कड, लिनेटा राऊत, डॉ. अक्षय मचाले आणि पूल कॅम्पस ड्राइव्ह समिती सदस्य होते.
(25049)

पर्वावरण संवर्धनासाठी
वनौषधी रोपांची लागवड
प्रा. नीलेश खळीकर (इंदिरा कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स)

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वाकड - ताथवडे येथील इंदिरा कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स यांच्यातर्फे चाणक्य कॅम्पस येथे स्थानिक प्रजातीच्या वनस्पतींचे रोपण करून त्यांना वाढविण्याची शपथ घेण्यात आली. या उपक्रमासाठी निसर्गराजा मित्र जीवांचे यांच्यातर्फे गणेर, पांगारा, कडीपत्ता, पळस, सीताफळ, अशोक अशी रोपे मिळाली होती. प्राचार्य डॉ. आनंद जुमळे आणि प्रा. डॉ. विपुल शहा यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व सांगितले. संगीत विभागाचे प्रा.नीलेश खळीकर यांनी पर्यावरणविषयक गीत सादर केले. वनस्पती विभागाचे किरण घोटकुले व प्राणीशास्त्र विभागाच्या डॉ. प्रतिभा बोंबले यांनी पर्यावरण संवर्धनाची माहिती दिली. शारीरिक शिक्षण विभागाचे साकेत निकाळजे यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना पर्यावरण रक्षणाची शपथ दिली. डॉ. प्रियंका साखरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. पियुष मिराणी यांनी आभार मानले. स्वप्नाली वायदंडे यांनी पर्यावरण जागृतीविषयी नृत्य सादर केले. इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या चेअरमन व मुख्य मार्गदर्शिका डॉ. तरिता शंकर, विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. पंडित माळी यांचे वेळोवेळी पर्यावरण जागृती विषयी मार्गदर्शन लाभत आहे.
(25050)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com