सतार-व्हायोलिन जुगलबंदीने जिंकली प्रेक्षकची मने

सतार-व्हायोलिन जुगलबंदीने जिंकली प्रेक्षकची मने

पिंपरी,ता. ९ ः उस्ताद शाकीर खान आणि तेजस उपाध्ये यांच्यातील सतार- व्हायोलिनची जुगलबंदी, श्रीनिवास जोशी व विराज जोशी यांचे सहगायन, कथ्थक नृत्याचे सादरीकरण अशा सांगीतिक मेजवानीने भारतरत्न पं.भीमसेन जोशी संगीत अकादमी महोत्सवातील रसिकांची मने जिंकली.
संगीत अकादमीच्या विद्यार्थ्यांच्या गायनाने महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरूवात झाली. शास्रीय गायन, तबला वादन आणि हार्मोनिअम वादनाने रसिकांची दाद मिळविली. त्यानंतर, पं. सुधाकर चव्हाण यांनी आपल्या शास्त्रीय गायनातून राग बिहाग सादर केला. त्यांचे गायन रसिकांच्या मनाला भिडले. त्यानंतर, उस्ताद शाकीर खान आणि तेजस उपाध्ये यांच्यातील सतार आणि व्हायोलिनच्या जुगलबंदीचा अनोखा अविष्कार पाहायला मिळाला. या दमदार जुगलबंदीने रंगलेली एक सुरेल संध्याकाळ रसिकांनी अनुभवली.
पं.दीपक महाराजांचे बहारदार कथ्थक
पं.श्रीनिवास जोशी आणि त्यांचे पुत्र विराज जोशी यांनी मालकंस राग सादर केला. पं. दीपक महाराज यांच्या अप्रतिम कथ्थक नृत्याने महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप झाला. विश्वजित लोंढे, निखिल वाघमारे, संतोष साळवे, समीर सूर्यवंशी यांनी तबल्याला समर्पक साथ दिली. हरिदास सावंत, उमेश पुरोहित, अजहरुद्दीन शेख यांनी हार्मोनिअमला साथसंगत केली. बासरीच्या माध्यमातून गायकांना जयवर्धन दधीच यांनी उत्तम साथ दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com