मुळशी धरणातील अतिरिक्त पाण्याची प्रतीक्षा

मुळशी धरणातील अतिरिक्त पाण्याची प्रतीक्षा

पिंपरी, ता. १० : वाढती लोकसंख्या पाहता शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी मुळशी धरणातील पाण्याची आवश्यकता आहे. त्याबाबत राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेने पत्राद्वारे ७६० एमएलडी पाणीसाठ्याची मागणी केली आहे. मात्र, त्‍यावर अजून सकारात्‍मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्‍यामुळे, शहरातील नागरिकांवरील पाणी कपातीचे संकट अद्यापही कायम आहे.
पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या ३० लाखांच्या पुढे गेली आहे. येत्या काही दशकांत लोकसंख्या वाढीत आणखीनच भर पडणार आहे. त्‍यामुळे, शहरातील पाण्याची गरज देखील तेवढ्या प्रमाणात वाढणार आहे. सध्या शहरासाठी पवना, आंद्रा आणि भामा आसखेड धरणातील एकूण ७७७ एमएलडी पाणी आरक्षित आहे. आंद्रा व भामा आसखेड प्रकल्पाचे काम अजून पूर्ण झालेले नाही. त्यामुळे, सध्या पवना व आंद्रा प्रकल्पाचे पाणी महापालिका घेत आहे. भविष्यात वाढणाऱ्या लोकसंख्येनुसार पाण्याची मागणी वाढणार आहे. उर्वरित पाण्याची गरज भागविण्यासाठी पाण्याचे नवे स्रोत महापालिकेस निर्माण करावे लागणार आहेत. त्यासाठी महापालिकेने मुळशी धरणात ७६० एमएलडी पाणी आरक्षित करण्याची मागणी धरण व्‍यवस्‍थापकांकडे केली होती. त्यामधील ९८.५० टक्के पाणी घरगुती पिण्यासाठी वापरले जाईल; तर १.५० टक्के पाणी औद्योगिक व व्यावसायिक कारणांसाठी वापर करण्याचा मानस आहे. त्यासाठी शासन निर्णयानुसार पुनर्स्थापना खर्च भरण्यास महापालिका तयार आहे.

जलसंपदा विभागाकडून उत्तर नाही
मुळशी धरणातील पाणी उचलण्यासाठी राज्‍य शासनाच्‍या जलसंपदा विभागाच्‍या परवानगीची गरज आहे. शहरासाठी ७६० एमएलडी पाण्याचे आरक्षण मंजूर करावे, असे पत्र महापालिका प्रशासनाने जलसंपदा विभागाच्‍या मुख्य अभियंत्यांना डिसेंबर २०२३ ला पाठविले होते. त्‍यावर अद्याप उत्तर आले नसल्‍याची माहिती महापालिकेच्‍या पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली.

मुळशी धरण व्‍यवस्‍थापकांनी जलसंपदा विभागाकडे परवानगी घेण्याचे कळविले होते. त्‍यानुसार, आम्‍ही संबंधित विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. परंतु, जलसंपदा विभागाकडून अद्याप आम्‍हाला उत्तर मिळालेले नाही.
- श्रीकांत सवणे, मुख्य अभियंता (पाणीपुरवठा), पिंपरी-चिंचवड महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com