मंत्रीपद वाटपात शिवसेनेवर दुजाभाव झाला

मंत्रीपद वाटपात शिवसेनेवर दुजाभाव झाला

तपासली आहे, मा. शीतलमॅडम यांनी तिन्ही टुडेला घ्यायला सांगितली आहे.
-----------------------------------------------------------------
मंत्रीपद वाटपात शिवसेनेवर दुजाभाव झाला
- खासदार श्रीरंग बारणे यांचा महायुतीला घरचा आहेर


पिंपरी, ता. १० : मंत्रिमंडळ वाटपात दुजाभाव झाला असल्‍याचा आरोप मावळचे श्रीरंग बारणे यांनी केला आहे. सात खासदार असूनही शिवसेनेला कॅबिनेट मंत्रीपद दिले नाही. मात्र ज्‍यांचा एकच किंवा दोन खासदार आहेत, अशा पक्षांना मात्र कॅबिनेट मंत्रीपद दिले असल्‍याचे सांगत खासदार बारणे यांनी सोमवारी (ता. १०) माध्यमांशी संवाद साधताना नाराजी व्यक्त केली.

खासदार बारणे म्‍हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍त्‍वाखाली काल शपथविधी पार पडला. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या शिवसेनेला कॅबिनेट मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती. कर्नाटकात जनता दल सेक्‍युलरचे दोन खासदार असलेल्‍या एचडी कुमारस्‍वामी यांना कॅबिनेट मंत्रीपद दिले. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्‍या पक्षाचे चार खासदार असताना त्‍यांना कॅबिनेट मंत्री पद दिले. बिहारमधून जिताराम मांझी हे एकटेच निवडून आलेले असताना त्‍यांनाही कॅबिनेट मंत्रीपद दिले. राज्‍यात महायुतीमध्ये भाजपने २८ जागा लढविल्‍या. त्‍यांचे नऊ खासदार निवडून आले. शिवसेनेने १५ जागा लढविल्‍या. त्‍यांचे सात खासदार निवडून आले. शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एक राज्‍यमंत्री पद मिळेल, अशी अपेक्षा होती. शिवसेना भाजपाचा जुना सहकारी मित्र पक्ष आहे. देशात सर्वाधिक मोठा पक्ष म्‍हणून तीसऱ्या क्रमांकावर मोठा पक्ष आहे. मंत्रीपद वाटपात शिवसेनेच्‍या वाटपात दुजाभाव झाला आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसबाबतही न्यायिक भूमिका घ्यायला हवी

तीन महिन्‍यात विधानसभा निवडूका जाहिर होतील. त्‍या पार्श्वभूमीवर योग्य भूमिका घ्यायला पाहिजे होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवर्तनाची मोठी भूमिका घेऊन सत्‍ता परिवर्तन करून दाखविण्याचे काम भाजपला दाखविले. शिवसेनेला न्‍यायिक भूमिका दिल्‍यास महाराष्ट्रात वेगळा संदेश गेला असता. याचा विचार भाजपने करायला हवा होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याची मोठी भूमिका घेतली. एनडीएतील घटक पक्ष म्‍हणून राष्ट्रवादीबाबतही न्‍यायिक भूमिका घ्यायला हवी. छत्रपतींच्‍या गादीला देखील मान द्यायला पाहिजे. साताऱ्यातून खासदार उदयनराजे तीन वेळा विजयी झाले आहेत. त्‍यांनाही मंत्री पद मिळाले असते तर; आनंद झाला असता असे खासदार श्रीरंग बारणे म्‍हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com