पालकांचे नियोजन कोलमडले

पालकांचे नियोजन कोलमडले

शाळेच्या नऊच्या वेळेमुळे पालकांची ‘परीक्षा’

शाळा, नोकरीला जाण्याची वेळ एकच येत असल्याने नोकरदारांचे नियोजन कोलमडले

पिंपरी, ता. ११ ः आगामी शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाची लगबग सुरू आहे. मात्र, दुसरीकडे चौथीपर्यंतच्या सर्व शाळा सकाळी नऊनंतर करावी, असा शासनाचा अध्यादेशामुळे पालकांचे नियोजन कोलमडले आहे. सकाळी सात वाजताच्या शाळेच्या वेळेनुसार नोकरी करणाऱ्या पालकांचे दिनचर्या बसलेली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पालकांची तारांबळ उडाली आहे.
शहरात महापालिका आणि खासगी सीबीएसई आणि राज्य मंडळाच्या इंग्रजी माध्यमांच्या ६५५ शाळा आहेत. सध्या शालेय विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टी सुरू आहे. मात्र, येत्या १५ जून महिन्यापासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. विशेष म्हणजे याच शैक्षणिक वर्षापासून शाळा भरविण्याचा वेळेत बदल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यात आगामी शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे अनेक पालकांमध्ये पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतची शाळा सकाळी नऊनंतर भरविण्याच्या शासन निर्णयाची चिंता वाढली आहे. या निर्णयामुळे काही पालक त्रस्त झाले आहेत. कारण सकाळी लवकर शाळा भरल्यास मुलांचा जेवणाच्या डब्यापासून ते तो शाळेतून आल्यानंतरच्या जेवणापर्यंतची सगळी व्यवस्था केली जाते. या निर्णयामुळे काही पालक व विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असला तरी या निर्णयाची अंमलबजावणी करताना काही शाळा, पालक, विद्यार्थी, बसवाहक यांच्यापुढे काही अडचणी आहेत.

सकाळी घरोघरी गडबड
या नव्या निर्णयामुळे मुलांना शाळेत सोडणे व नोकरीला जाण्याची वेळ एकच होऊ लागली आहे. त्यामुळे काही शाळा चालकांसह पालकांनी पूर्वीच्या वेळाच कायम ठेवण्याचा आग्रह होण्याची शक्यता आहे. त्याविषयीचा पत्रव्यवहारही शालेय शिक्षण विभागाशी केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. आगामी काळात राज्यभरातील शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांकडून अशी मागणी झाल्यास शिक्षण विभाग शाळा भरविण्याच्या पूर्वीच्या वेळा कायम ठेवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

‘‘काही शाळा दोन सत्रांमध्ये काही शाळा भरतात. पालकांच्या सोईनुसारच शाळा वेळ ठरविणार आहेत. पालकांच्या विरोधात जाऊन आम्ही शाळांची वेळ बदलणार नाही.’’
- राजेंद्र सिंग, सचिव, ईसा संघटना महाराष्ट्र

मी सकाळी मुलीला शाळेत पाठविल्यावर मी पुण्यात कामाला जाते. माझी नऊची ड्यूटी आहे. आता नव्याने शाळेची वेळ बदलल्यामुळे रुटीन बिघडणार आहे. कामाच्या वेळा सांभाळावे की मुलीच्या शाळेचे पहावे, असा पेच निर्माण झाला आहे.
- सुजाता जाधव, पालक आकुर्डी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com