खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या मनमानीला आळा बसणार

खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या मनमानीला आळा बसणार

Published on

पिंपरी, ता. ११ ः दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खासगी प्रवासी बसचे (ट्रॅव्हल्स) भाडेदर आणि रस्ता सुरक्षेच्यादृष्टीने पुणे आणि पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालय सतर्क झाले आहे. त्याने ट्रॅव्हल्सचालकांच्या मनमानी भाडेवाढीला चाप बसणार असून त्यादृष्टीने भरारी पथके नेमली जाणार आहेत. खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी एसटी दरपत्रकापेक्षा दीडपटपेक्षा अधिक पैसे घेतल्यास कारवाई करण्याचा इशारा ‘आरटीओ’ने दिला आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाकडून खासगी बस ओनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांकडून वरील इशारा देण्यात आला. या संदर्भात नागरिकांनीही ‘आरटीओ’कडे तक्रार करण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी केले.
पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील नागरिक मोठ्या संख्येने स्थायिक झाले आहेत. दिवाळीत शाळा, महाविद्यालयांना सुटी असल्यामुळे नागरिक हमखास गावी जातात. रेल्वे आणि एसटी आरक्षण फुल्ल असल्यामुळे नागरिक खासगी ट्रॅव्हल्स बसने प्रवास करतात. खासगी प्रवासी बसला एसटी महामंडळाच्या प्रवासी तिकीट दराच्या दीडपटपेक्षा जादा भाडेदर आकारण्यास राज्य शासनाच्या २०१८ च्या निर्णयानुसार बंदी आहे ; पण ट्रॅव्हल्सला मागणी जास्त असल्यामुळे ट्रॅव्हल्स चालक या कालावधीत नियमित तिकीट दरापेक्षा दुप्पट ते तिप्पट वाढ करतात. पण, आता वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि तिकिटाचे जादा पैसे आकारणाऱ्या ट्रॅव्हल्सवर ‘आरटीओ’ची करडी नजर असणार आहे. मोटार वाहन निरीक्षकांमार्फत कारवाई केली जाणार असल्याची माहिती आरटीओ अधिकाऱ्यांनी दिली.

कुठे करता येईल तक्रार ?
प्रवाशांची खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी लूट थांबविण्यासाठी पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नागरिकांना ‘आरटीओ’ कार्यालयात लेखी किंवा dyrto.14-mh@gov.in या ई-मेल आयडीवर ऑनलाइन तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

एसटीचे कोणत्या मार्गावर किती भाडे ?
मार्ग - साधी बस - सेमी - वातानुकूलित स्लिपर शिवशाही
पिंपरी-नागपूर -१२७२ -१७२६ - १८८५
पिंपरी-अमरावती - १०२१ - १३८५ - १५१३
पिंपरी-अकोला - ८५० - ११५३ - १२६०
पिंपरी-जळगाव - ६९९- - - १०३७
पिंपरी-खामगाव - ७७० - ११४१ -
पिंपरी-शेगाव - ८१० - -
पिंपरी-परभणी - ७०० - -
पिंपरी-लातूर - ५८० - ७८४ -
पिंपरी-सोलापूर - ४५८ - ६३४ - ६८०
पिंपरी-मलकापूर - ७५० - -
पिंपरी-भुसावळ - ७५० - - ९६२
पिंपरी -बुलडाणा - ६७० - -
पिंपरी-यवतमाळ - १०२१ - -

जादा पैसे आकारणाऱ्या ट्रॅव्हल्स चालकांची प्रवाशांनी ‘आरटीओ’कडे ऑनलाइन तक्रार करावी. दिवाळीत ‘आरटीओ’च्या भरारी पथकांमार्फत ट्रॅव्हल्सची तपासणी केली जाणार असून त्यात दोषी आढळल्यास मोटर वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- संदेश चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com