दिवाळीच्या तोंडावर पथदिवेच ‘अंधारात’

दिवाळीच्या तोंडावर पथदिवेच ‘अंधारात’

Published on

पिंपरी, ता. १२ : शहरातील रस्त्यांवर २०२१ मध्ये बसविण्यात आलेले एलईडी पथदिवे चार वर्षांतच नादुरुस्त झाले आहेत. अनेक मार्गांवरील ‘एलईडी’ दिवे बंद आहेत. तर, काहींचा प्रकाश मंदावला आहे. परिणामी, पादचारी आणि वाहनाचालकांना अंधारातूनच वाट शोधावी लागत आहे. विशेष म्हणजे, या पथदिव्यांच्या देखभाल-दुरुस्तीची सात वर्षांची हमी आहे. तरीही, पथदिवे बदलले जात नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

उर्जेचा वापर कार्यक्षमतेने करणे आणि ऊर्जा बचतीस प्रोत्साहन देण्यासाठी ‘उर्जा संवर्धन धोरण २०१७’ जाहीर करण्यात आले आहे. या धोरणातील तरतुदींनुसार राज्यातील सर्व नगर परिषद, महानगरपालिका, विकास प्राधिकरणे, ग्रामपंचायत, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच सर्व शासकीय कार्यालयाच्या परिसरांत एलईडी पथदिवे बसविणे बंधनकारक होते. पिंपरी चिंचवड महापालिकेनेही ऊर्जा संवर्धनाच्या दृष्टीने शहरातील विविध रस्त्यांवरील जुने हायप्रेशर सोडियम वेपर (एचपीएसव्ही) पथदिवे काढून नवीन एलईडी पथदिवे बसविणे व इतर बाबींसाठी प्रशासकीय मान्यता दिली. २०२१ मध्ये ‘एचपीएसव्ही’ पथदिवे काढून शासकीय ‘एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिस लिमिटेड (ईईएसएल) कंपनीमार्फत सुमारे ३७ हजार ३३५ नवीन एलईडी पथदिवे बसविले होते. मात्र, चारच वर्षांत शहरातील अनेक मार्गावरील ‘एलईडी’ दिवे नादुरुस्त झाले आहेत.
एलईडी पथदिव्यांची देखभाल व दुरुस्तीचा कालावधी किमान सात वर्षे असेल अशी अट निविदेत समाविष्ट होती. पण, आता हे पथदिवे बदलण्याची तसदी ना महापालिका प्रशासन घेत, ना संबंधित कंपनी दुरुस्त करण्याची. महापालिका प्रशासनाने या रस्त्यावरील पथदिवे दुरुस्त करुन मोठे पथदिवे लावण्याची मागणी केली जात आहे.

- माहिती दृष्टीक्षेपात
शहरात १२ ते ८० फूट रुंदीचे डांबरी, सिमेंट रस्ते
१,३०० किलोमीटरचे मुख्य व अंतर्गत रस्ते
१ लाख ९ हजार : शहरातील एकूण पथदिवे
३७,३३५ : पथदिवे बदलले

शहरातील मार्गावर एलईडी बल्ब बसविले आहेत. सध्या अनेक मार्गांवरील पथदिवे बंद दिसतात किंवा उजेड नसल्यामुळे रस्त्यावर अंधार असतो. पालिकेने हे पथदिवे दुरुस्त करावेत.
- रवींद्र कदम, नागरिक

‘ईइएसएल’ संस्थेकडून पथदिवे दुरुस्त करुन दिले जातात. ३० दिवसांची मुदतीत त्यांनी ते दुरुस्त करुन देणे अपेक्षित आहेत. पण, जर त्यांच्याकडून ते बदलून किंवा दुरुस्त करुन दिले जात नसतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल.
- अनिल भालसाखळे, सहशहर अभियंता (विद्युत), महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com