तरुणाकडून रोकड लुटून 
महिलेवर तलवारीने वार

तरुणाकडून रोकड लुटून महिलेवर तलवारीने वार

Published on

पिंपरी : दारू पिण्यासाठी पैसे हवे असल्याने एका तरुणाच्या खिशातून जबरदस्तीने पैसे काढून घेतले. त्यानंतर तरुणाच्या आईवर तलवारीने वार करीत जखमी केले. तसेच हवेत तलवार फिरवत परिसरात दहशत माजवली. हा प्रकार चिंचवडमधील अजिंठानगर येथे घडली. याप्रकरणी मयूर सुनील क्षेत्रे (रा. चिंचवड) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रतीक कैलास गजरमल आणि दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी फिर्यादीच्या खिशातून एक हजार रुपये दारू पिण्यासाठी जबरदस्तीने काढून घेतले. आरोपी प्रतीक याने त्याच्या हातातील तलवार उगारली असता फिर्यादी घाबरून पळत असताना त्यांची आई मध्ये आल्या. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्या आईच्या डाव्या हाताच्या बोटावर किरकोळ जखम केली आणि लाथ मारली. तसेच, फिर्यादी आणि त्यांच्या आईला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर हवेत तलवार फिरवत ‘मी इथला भाई’ असे ओरडून परिसरात दहशत माजवली.

काळेवाडीत एक लाखाची फसवणूक
पिंपरी : फ्लिपकार्ट कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे भासवून एका महिलेची एक लाख तीन हजार ५५३ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी अलमास सय्यद अहमद काझी (रा. काळेवाडी) यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विकीकुमार नावाचा व्यक्ती व इतर अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने फिर्यादीला फोन करून तुमची कॅश ऑन डिलिव्हरी होत नाही. तुम्ही ऑनलाइन पेमेंट करा असे सांगितले. आरोपीने फिर्यादीच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर विविध स्कॅनर पाठवून फिर्यादीकडून एकूण एक लाख तीन हजार ५५३ रुपये घेतले.

ऑनलाइन टास्कच्या नावाखाली फसवणूक
पिंपरी : ऑनलाइन टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली एका व्यक्तीची ६८ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना चिखलीतील मोरेवस्ती येथील भावेश्वरी कॉलनी येथे घडली. याप्रकरणी वैष्णील अनिल तायडे (रा. चिखली, पुणे) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी फिर्यादीला ‘मर्चेंट टास्क’ केल्यास आर्थिक फायदा होईल, असे आमिष दाखवले. त्यानंतर, त्यांना ‘सिनियर ग्रुप’मध्ये सामील करून घेतले आणि विविध टास्कमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या खात्यांमध्ये एकूण ६८ हजार रुपये जमा करायला लावले. आरोपींनी फिर्यादीला पैसे परत मिळतील असे भासवून त्यांची ऑनलाइन फसवणूक केली.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com