पिंपरी-चिंचवड
केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये नॅशनल स्पेस डे उत्साहात
पिंपरी, ता. २७ : केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या आकुर्डी व पुनावळे येथे ‘नॅशनल स्पेस डे’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नासाची अंतराळ अभ्यासक डॉ. लीना बोकील तसेच डीआरडीओचे शास्त्रज्ञ जोशी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
वर्णेकर युनिव्हर्सल फाउंडेशन केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल या शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. धनंजय वर्णेकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला लोकमान्य बँकेचे चेअरमन डॉ. किरण ठाकूर उपस्थित होते. या उपक्रमात कॉसमो स्पेस, मीरा सिनेमा प्रॉडक्शन, पुणेचे संस्थापक कमलाकर बोकील आणि ‘तारे जमीन पर’ बेंगळुरू यांच्या वतीने मोबाईल डोमद्वारे विद्यार्थ्यांना ग्रह-ताऱ्यांची माहिती सादर करण्यात आली. याचे चित्रीकरण करून कॉसमो स्पेस मीरा सिनेमा प्रॉडक्शन या यूट्यूब चॅनलवर प्रसारित करण्यात आले आहे.