उर्से टोलनाका येथे 
निवारा शेडची मागणी

उर्से टोलनाका येथे निवारा शेडची मागणी

Published on

सोमाटणे, ता. २९ ः पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील जुन्या उर्से टोलनाका येथे एसटी बस थांबते, पण येथे बस थांबा, तिकीट खिडकी व निवारा शेड नसल्यामुळे प्रवासी आणि वाहकांना उन्हात व पावसात उभे राहावे लागते.
गेल्या दहा वर्षांपासून या ठिकाणी प्रवाशांची वर्दळ वाढली असून, मुंबईकडे जाण्यासाठी अनेक प्रवासी येथे चढ-उतर करत असतात. प्रवाशांची ही अडचण लक्षात घेऊन एसटी महामंडळाने येथे एका वाहकाची नियुक्ती केली आहे. हा वाहक सर्व प्रवाशांना तिकीट देतो व बसमध्ये बसविण्याची जबाबदारी पार पाडतो. तो दररोज दिवसभर उन्हा-पावसात उभा राहतो. मात्र, या ठिकाणी निवारा शेड नसल्यामुळे प्रवाशांबरोबरच या वाहकालाही त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी जुन्या उर्से टोलनाक्यावर एक निवारा शेड व वाहकासाठी केबिन उभारण्याची मागणी केली आहे.

जुना उर्से टोलनाका ः निवारा शेड नसल्याने उन्हात थांबलेले प्रवासी आणि वाहक.
SmT29SF1.

Marathi News Esakal
www.esakal.com