विसर्जन मिरवणुकीनिमित्त आजपासून वाहतुकीत बदल

विसर्जन मिरवणुकीनिमित्त आजपासून वाहतुकीत बदल

Published on

पिंपरी, ता. ४ : सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडून पिंपरी, चिंचवड, भोसरी, दापोडी, मोशी, वाकड, हिंजवडी परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्या त्या भागांतील गरजेनुसार हे बदल शुक्रवार (ता. ५) व शनिवारी (ता. ६) लागू राहणार आहेत.

भोसरी, दापोडी, मोशी परिसर
- खडकीकडून हॅरिस पूल मार्गे सेवा रस्त्याने फुगेवाडीकडे जाण्यास वाहनांना प्रवेश बंदी. या मार्गावरील वाहने ग्रेड सेप्रेटरमार्गे फुगेवाडी चौकातून जातील.
- दापोडी शितळा देवी चौक येथे फुगेवाडी- दापोडी पुलावरून आलेल्या वाहनांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकाकडे जाण्यास प्रवेश बंदी. ही वाहने शितळादेवी चौकातून उजव्या बाजूस वळून सांगवीकडून जातील.
- भोसरीतील बाबर पेट्रोल पंप चौकाकडून आलेल्या वाहनांना भोसरी पुलाखाली प्रवेश बंदी. ही वाहने आळंदीहून देहू रस्त्याने भारतमाता चौकातून जातील.
- डुडूळगाववरुन आलेल्या वाहनांना जुन्या मोशी - आळंदी रस्त्याने हवालदार वस्ती चौक ते मोशी चौकात येण्यास प्रवेश बंदी राहणार. आळंदी - देहू रस्त्याने भारतमाता चौकातून जातील.
- पुणे - नाशिक महामार्गावरुन आलेल्या वाहनांना जुन्या मोशी - आळंदी रस्त्याने मोशी चौक ते हवालदार वस्ती चौक जाण्यास प्रवेश बंदी. ही वाहने पुणे- नाशिक महामार्गावरून भारतमाता चौकातून जातील. हा बदल शुक्रवार (ता. ५) व शनिवार (ता. ६) दुपारी दोन ते रात्री बारा या वेळेसाठी असेल.

वाकड परिसर
- वाकड परिसरातील साठे चौक येथून दत्त मंदिर रोड येथून वाहनांना प्रवेश बंदी. या मार्गावरील वाहने कावेरीनगर किंवा उजवीकडे वळून काळाखडक चौक मार्गे जातील.
- दत्त मंदिर रस्ता, वाकड ते म्हातोबा चौक या मार्गावर वाहनांना प्रवेश बंदी. ही वाहने कस्पटे कॉर्नर येथून जातील.
- पोलारिस हॉस्पिटल चौक दत्त मंदिर रस्ता तसेच सम्राट चौक दत्त मंदिर रस्ता येथील वाहतूक गरजेनुसार वळविण्यात येईल. हा बदल शुक्रवारी (ता.५) दुपारी चार ते रात्री बारापर्यंत असेल.

चिंचवड परिसर
- चिंचवडमधील अहिंसा चौक ते चाफेकर चौक या मार्गावर वाहनांना प्रवेश बंद राहणार. या मार्गावरील वाहने एसकेएफ चौकातून खंडोबामाळकडून मुंबई पुणे महामार्गाने जातील.
- दळवीनगर पूल ते चापेकर चौक या मार्गावरील वाहने वाल्हेकरवाडी जुना जकात नका येथून डावीकडे वळून जैन शाळेपासून बिजलीनगर अथवा एसकेएफ मार्गे खंडोबामाळ मार्गे जातील.
- पीएमटी बस थांबा येथून चापेकर चौकात जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद. ही वाहने लिंक रोडने डावीकडे वळून काळेवाडी मार्गे जातील.
- भोई आळी तसेच चिंचवड चौकी येथून चापेकर चौक या मार्गावर वाहनांना प्रवेश बंद. ही वाहने केशवनगर मार्गे जातील.
- चिंचवडमधील चिंतामणी चौक ते वाल्हेकरवाडी ते रिव्हर व्ह्यू चौकाकडे जाण्यास वाहनांना प्रवेश बंद. ही वाहने चिंचवडे फार्म वाल्हेकरवाडी रावेत मार्गे जातील.
- चिंचवडमधील अहिंसा चौक व रिव्हर व्ह्यू चौकाकडून चापेकर उडाणपुलावरून येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद. ही वाहने रिव्हर व्ह्यू चौकाकडून वाल्हेकरवाडी मार्गे इच्छितस्थळी व अहिंसा चौक ते महावीर चौक किंवा एसकेएफ चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
- हिंजवडीतील टाटा जंक्शन चौकाकडून मेझा नाईन चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहणार. माणगाव, विप्रो सर्कल फेज एक कडून येणारी वाहने जॉमेट्रिक सर्कल चौकाकडून डावीकडे वळून टाटा जंक्शन चौकाकडे जाऊन उजवीकडे वळून लक्ष्मी चौक मार्गे जातील.
- मेझा नाईन चौकाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाण्यास प्रवेश बंद. ही वाहने लक्ष्मी चौक, विनोदी चौकमार्गे जातील.
- छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी चौकाकडून हिंजवडी गावठाणकडे जाण्यास प्रवेश बंदी. साखरे वस्ती व इंडियन ऑईल चौकाकडून येणारी वाहने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून डाव्या बाजूच्या एकेरी मार्गाने विप्रो सर्कल फेज ०१ चौक, जॉमेट्रिक
सर्कल चौक, टाटा टी जंक्शन चौक मार्गे जातील.
- कस्तुरी चौकाकडून हिंजवडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाण्यास प्रवेश बंद राहणार. मारुंजी वाय जंक्शन व इंडियन ऑईल चौकाकडून येणारी वाहने कस्तुरी चौक, विनोदी वस्ती चौक, लक्ष्मी चौक मार्गे जातील.
हा बदल शनिवारी (ता. ६) दुपारी तीन ते रात्री बारापर्यंत असेल.

पिंपरी परिसर
- पिंपरीतील सर्जा हॉटेलकडे येणारी वाहतूक तसेच पवनेश्वर मंदिराकडे येणारी वाहतूक बंद राहणार. ही वाहने पवनेश्वर मंदिराकडे तसेच सर्जा हॉटेलकडे येणारी वाहने पिंपरीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळामार्गे गावातून जातील.
- डिलक्स चौक, जमतानी चौक, अशोक थिएटर, भाटनगरकडे येणारी वाहतूक बंद राहणार. काळेवाडी पुलावरुन येणारी वाहने डिलक्स चौक, कराची चौकाकडे न जाता स्मशानभूमी चौकातून उजवीकडे वळून जमतानी चौक व गेलार्ड चौकाकडे महात्मा फुले कॉलेज, डेअरी फार्म मार्गे मुंबई-पुणे महामार्गाने जातील.
- शगुन चौक, कराची चौक, डिलक्स चौक, आर्य समाज चौक, साई चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहणार. मुख्य मिरवणुकीच्यावेळी पिंपरी चौकातून येणारी व गोकुळ हॉटेल मार्गे पिंपरी पुलावरुन शगुन चौकाकडे जाणारी वाहने पिंपरी पुलावरुन शगुन चौकाकडे न जाता पिंपरी पुलावरुन उजवीकडे वळून भाटनगर मार्गे चिंचवड येथून इच्छित स्थळी जातील.
हा बदल शनिवारी (ता. ६) दुपारी दोन ते रात्री बारापर्यंत असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com