स्वराष्ट्र घडविणे स्वभाव झाला पाहिजे ः प्रा. शिरोळकर
पिंपरी, ता. ८ ः ‘‘स्वराष्ट्र घडविणे हा आपला स्वभाव झाला पाहिजे; तरच प्रत्येक छोट्यामोठ्या कृतीतून राष्ट्र उभारणीचे कार्य आपल्या हातून घडेल’’ असे विचार ज्येष्ठ समुपदेशिका प्रा. मैत्रेयी शिरोळकर यांनी व्यक्त केले.
शिक्षक दिनानिमित्त क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती आयोजित कार्यक्रमात ‘स्वबोध आणि चिंतन’ या विषयावर विविध शाळांमधील शिक्षकांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, समिती सदस्य सुहास पोफळे, शाहीर आसराम कसबे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. शिरोळकर म्हणाल्या, ‘महाविद्यालयात असताना सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास केला. त्यातून हिंदू तत्त्वज्ञान आणि जीवनपद्धती ही देशातील अति दुर्गम भागातही रुजली असल्याचे त्यांना आढळून आले. ‘स्वबोध’ या संकल्पनेत स्वतःला जाणून घेताना सर्वात आधी माझे कर्तव्य समजून घेत नंतर आपल्या हक्कांचा विचार केला पाहिजे.’
गिरीश प्रभुणे यांनी प्रास्ताविक केले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित क्रांतिवीर चापेकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर, क्रांतिवीर चापेकर प्राथमिक विद्यामंदिर, खिंवसरा-पाटील विद्यामंदिर, बाळकृष्ण चापेकर बालक मंदिर, लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय आणि पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् या शाळांमधील शिक्षक-शिक्षिकांना मान्यवरांकडून सन्मानित करण्यात आले. श्रद्धा होनशेट्टी, वैशाली कयापाक, मनीषा ठाकूर या शिक्षिकांनी प्रातिनिधिक मनोगते व्यक्त केली. अखंड भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून गुरुकुलममधील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ऋचा आणि स्वागतगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. संयोजनात अतुल आडे, समर्थ डोंगरे, हर्षदा धुमाळ, वृषाली सहाणे, सागर शेवाळे, विशाल पाटील, किरण गायकवाड, ज्ञानेश्वर वाघमारे यांनी सहकार्य केले. सतीश अवचार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अशोक नगरकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.