विसर्जनासाठी पालिकेची तयारी पूर्णत्वास

विसर्जनासाठी पालिकेची तयारी पूर्णत्वास

Published on

पिंपरी, ता. ५ : पिंपरी-चिंचवड महापालिका दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरातील गणेश विसर्जन सुरळीत, सुरक्षित व पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडावे म्हणून तयारी पूर्णत्वास आली आहे. आरोग्य सुविधा, स्वच्छता व पर्यावरण संवर्धनासाठी महापालिकेच्या विविध विभागांनी नियोजन केले आहे.
शहरातील २७ अधिकृत विसर्जन घाटांवर प्रकाशव्यवस्था, पिण्याचे पाणी, वाहनतळ, वैद्यकीय सुविधा, सुरक्षाव्यवस्था आणि वाहतूक नियोजन करण्यात आले आहे. मोशी खाण हे मुख्य विसर्जनस्थळ असून तेथे क्रेन, आवश्यक मनुष्यबळ, पथदिवे, रस्त्यांची सुधारणा, दिशादर्शक फलक, सुरक्षारक्षक आणि अग्निशमन यंत्रणा तैनात केली आहे. प्रत्येक घाटावर प्रशिक्षित जीवरक्षकांची पथके, रेस्क्यू बोट, लाइफ जॅकेट्स, लाइफ रिंग्ज आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. गर्दी व आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन दलही सज्ज असेल. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिने महत्त्वाच्या विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथके व सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, वॉर्डबॉय आणि सफाई कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, मुबलक औषधसाठा व तत्काळ उपचारासाठी आवश्यक उपकरणे सज्ज ठेवण्यात आली आहेत.
पिंपरी कॅम्पातील कराची चौक आणि चिंचवडमधील चापेकर चौकात मिरवणूक येताच चे महापालिकेकडून पुष्पवृष्टी करण्यात येईल. त्यानंतर पारंपरिक कला सादर करण्यास मंडळांच्या कला पथकांना दहा ते पंधरा मिनिटांचा अवधी दिला जाईल. वेगवेगळ्या कला पथकांची प्रदर्शने झाल्यानंतर मिरवणूक मार्गस्थ करण्याचे नियोजन आहे.
दरम्यान, मिरवणूक व ढोल पथकांची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांचे व मिरवणुकीचे नियोजन करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचे सदस्य कार्यरत राहणार आहेत.
----
गणेशभक्तांना आवाहन
- नदी-नाल्यात वस्तू टाकू नये
- पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना देण्यासाठी कृत्रिम जलकुंडे, निर्माल्य कलशात हार, फुले, पाने व पूजेचे साहित्य टाकावे
-‘पुनरावर्तन’ उपक्रमांतर्गत २६ केंद्रांवर शाडू मातीच्या मूर्ती जमा कराव्यात
- पीओपी मूर्तींसाठी अमोनियम बायकार्बोनेटचा वापर होणार असल्याने त्या जमा कराव्यात
- अधिकृत घाटांवरच विसर्जनासाठी करावे
- नदी पात्रात प्रवेश करू नये
- लहान मुलांना पाण्याजवळ एकटे सोडू नये
- आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास महापालिकेच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा
-----

गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांची सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. विसर्जन घाटांवर जीवरक्षक, वैद्यकीय पथके व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तैनात असून, पर्यावरणपूरक व सुरळीत विसर्जनासाठी महापालिकेची तयारी पूर्ण झाली आहे. नागरिकांनी विसर्जन घाटांवर तैनात असणारी मदत पथके व सुरक्षा पथकांच्या येणाऱ्या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका
-----

प्रभागनिहाय मूर्ती संकलन
४ सप्टेंबर रात्री १० वाजेपर्यंतची आकडेवारी
अ / ६,५१२
ब / १६,९०८
क / ४,८५५
ड / ६,९६७
ई / ६,०८९
फ / ८,०९२
ग / ७,०७९
ह / ५,९६७
एकूण / ६२,४६९
पर्यावरण पूरक मूर्ती / १४,००८
पीओपी मूर्ती / ४८,४६१
----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com